-

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते. या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्राचा तूळ राशीत प्रवेश झाला असून २६ नोव्हेंबरपर्यंत तो याच राशीत राहील. याचदरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी ७ वाजून ५८ मिनिटांनी बुध देखील तूळ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या काळात बुध-शुक्राची युती निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दोन ग्रहांच्या युतीमुळे “लक्ष्मी-नारायण योग” निर्माण होतो. हा योग खूप प्रभावी मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा योग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
‘लक्ष्मी-नारायण योग’ बक्कळ धनलाभ देणार, बुध-शुक्राच्या युतीमुळे नोकरी-व्यवसायात भरघोस प्रगती होणार
Laxmi-Narayan Yog 2025: पंचांगानुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्राचा तूळ राशीत प्रवेश झाला असून २६ नोव्हेंबरपर्यंत तो याच राशीत राहील. याचदरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी ७ वाजून ५८ मिनिटांनी बुध देखील तूळ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या काळात बुध-शुक्राची युती निर्माण होईल.
Web Title: Budh shukra make laxmi narayan yog kumbha tula and mesh zodic sign get high success career growth new job and money sap