-

आयुष्य वाढवणे आता कठीण अलीकडच्या काळात वैद्यकीय प्रगतीमुळे मानवाचे सरासरी आयुष्य वाढले आहे. पण, एका नव्या अभ्यासानुसार आता ही वाढ पुढे नेणे कठीण ठरणार आहे. मानवाच्या शरीराची नैसर्गिक मर्यादा जवळ येत चालली आहे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
-
संशोधन कुठे झाले? हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय, शिकागो (University of Illinois Chicago) येथील प्राध्यापक एस. जे. ओलशान्स्की (S. J. Olshansky) आणि त्यांच्या टीमने केले. त्यांनी विविध देशांतील आयुष्याच्या आकडेवारीचा अभ्यास करून निष्कर्ष मांडले.
-
अभ्यासात घेतलेले देश १९९० ते २०१९ या ३० वर्षांच्या काळात सर्वाधिक आयुष्य असलेल्या देशांचा अभ्यास करण्यात आला. यात जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश होता.
-
फक्त ६.५ वर्षांचीच वाढ या काळात सर्वाधिक आयुष्य असलेल्या देशांमध्ये लोकांच्या सरासरी आयुष्यात फक्त ६.५ वर्षांचीच वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, वैद्यकीय सुधारणा असूनही दीर्घायुष्य वाढीचा वेग मंदावला आहे.
-
१०० वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता कमी या संशोधनानुसार २०१९ नंतर जन्मलेल्या मुलींमध्ये १०० वर्षांपर्यंत जगण्याची शक्यता फक्त ५.३ टक्के, तर मुलांमध्ये १.८ टक्के इतकीच आहे; म्हणजेच १०० वर्षांपेक्षा जास्त जगणे अजूनही अत्यंत दुर्मीळ आहे.
-
वाढत्या वयाचे परिणाम शरीरात वयानुसार होणारे बदल, पेशींची झीज आणि अंगातील क्षमता कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावर नियंत्रण ठेवणे सध्या शक्य नाही, त्यामुळे मानवाचे आयुष्य एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वाढणे कठीण होत आहे.
-
वैद्यकीय सुधारणा असूनही अडथळे कायम आधुनिक उपचारपद्धती, चांगले अन्न आणि जीवनशैलीमुळे अनेक आजारांवर मात करता येते. पण, वृद्धत्वाची प्रक्रिया (Aging Process) थांबवणारे उपाय अजून सापडलेले नाहीत, त्यामुळे मानवी आयुष्याच्या मर्यादेवर नैसर्गिक बंधने कायम आहेत.
-
भविष्यातील अशा ‘अँटी-एजिंग’ संशोधनात शास्त्रज्ञांच्या मते, जर आयुष्य वाढवायचे असेल तर केवळ आजारांवरील औषधे नव्हे, तर वृद्धत्व थांबवणाऱ्या औषधांवर आणि जनुकीय (genetic) संशोधनावर भर द्यावा लागेल. हीच पुढील पिढीची सर्वात मोठी वैज्ञानिक आव्हाने असतील.
-
‘मर्यादेपलीकडे जगणे’ अजून दूरच या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की, सध्याच्या परिस्थितीत मानवाचे सरासरी आयुष्य आणखी वाढवणे कठीण आहे. वैद्यकीय प्रगती होत असली तरी मानवी जैविक मर्यादा (biological limit) ओलांडणे अजूनही फार दूरचे स्वप्न आहे. (सर्व फोटो सौजन्य : पेक्सल्स)
Life Expectancy: दीर्घायुष्याचं स्वप्न किती वास्तव? नव्या संशोधनातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष!
नवीन संशोधनानुसार दीर्घायुष्याची सरासरी वाढ आता थांबण्याच्या टप्प्यावर; वय वाढवणाऱ्या औषधांवरच भविष्यातील आशा
Web Title: Life expectancy dhow long can humans really live shocking new research reveals truth svk 05