-

फक्त वय नव्हे, शरीराचा संकेत Anglia Ruskin University च्या संशोधनानुसार, पांढरे केस हे केवळ वृद्धत्वाचं नव्हे, तर शरीराच्या कर्करोगाविरोधातील संरक्षणाचंही लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
केस पांढरे कसे होतात? केसांना रंग देणाऱ्या melanocytes पेशी कमी झाल्या किंवा बंद पडल्या की, केस पांढरे होतात. हा बदल केसांच्या फॉलिकलमधील स्टेम सेल्समध्ये सुरू होतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
DNA नुकसानाचं कारण जेव्हा melanocyte stem cells मधील DNA ची हानी होते, तेव्हा त्या पेशी कायमस्वरूपी बदलतात आणि बाहेर पडतात. त्यामुळे केसांचा रंग हरवतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
शरीराची संरक्षण प्रक्रिया पांढरे केस म्हणजे शरीरातील काही पेशींनी स्वतःचं ‘बलिदान’ देऊन नुकसान झालेल्या पेशींना कर्करोगात रूपांतर होण्यापासून थांबवलं आहे, असा संकेत असू शकतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
संरक्षण अपयशी झाल्यास जर ही प्रक्रिया थांबली, तर नुकसान झालेल्या पेशी पुन्हा वाढू शकतात आणि त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पांढरे केस म्हणजे कर्करोग नाही केस पांढरे होणं म्हणजे कर्करोग होईल, असं नाही आणि काळे केस म्हणजे धोका नाही, असंही नाही. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
काळजी कशी घ्यावी? त्वचेला सूर्यकिरणांपासून जपा, रसायनांचा वापर कमी करा, धूम्रपान टाळा आणि संतुलित आहार घ्या. त्यामुळे पेशी आणि त्वचा सुस्थितीत राहील. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…)
पांढऱ्या केस आणि कर्करोगाचा काय आहे संबंध? वैज्ञानिक संशोधनातून समोर आले धक्कादायक निष्कर्ष!
Grey hair and cancer : पांढरे केस आणि कर्करोग यांचा आश्चर्यकारक संबंध जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि संपूर्ण माहिती!
Web Title: Grey hair and cancer connection full explanation body defense mechanism revealed svk 05