• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. early warning signs of colon cancer symptoms seen during bowel movements and digestive changes svk

शौच करताना दिसतायत ‘ही’ लक्षणं; असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं निदान!

सुरुवातीला शांत दिसणारा कोलन कॅन्सर ओळखण्यासाठी ही सहा चिन्हं महत्त्वाची; वेळेवर निदान झाल्यास उपचार सोपे आणि परिणामकारक ठरतात.

November 11, 2025 17:49 IST
Follow Us
  • Colon cancer signs
    1/7

    कोलन कॅन्सर हा जगभरात आढळणाऱ्या सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तो शांतपणे वाढत जातो आणि बहुतांश वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. पण, काही संकेत ओळखले तर वेळेवर उपचार शक्य होतात. जाणून घ्या अशी सहा लक्षणं, जी कोलन कॅन्सरचे संकेत असू शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

  • 2/7

    पोटदुखी किंवा आकडी: खालच्या पोटात सतत वेदना, आकडी किंवा फुगल्यासारखं वाटणं हे कोलनमध्ये ट्यूमर वाढत असल्याचं संकेत असू शकतं. अशी वेदना वारंवार होत असेल तर ती दुर्लक्ष करू नका. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

  • 3/7

    शौचात रक्त दिसणे: शौचात तांबडं किंवा काळसर रक्त दिसणं हे कोलनमधील आतल्या रक्तस्त्रावाचं लक्षण असू शकतं. हे कोलन कॅन्सरचं सर्वात सामान्य आणि गंभीर चिन्ह मानलं जातं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

  • 4/7

    थकवा आणि अशक्तपणा: सतत थकवा जाणवणं, झोप पूर्ण झाल्यानंतरही कमजोरी जाणवणं हे आतून होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे किंवा रक्ताल्पतेमुळे (अ‍ॅनिमिया) होऊ शकतं. हे कॅन्सरच्या वाढीचं अप्रत्यक्ष लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

  • 5/7

    अपूर्ण शौचाची भावना: शौचानंतरही पूर्ण पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही का? अशी भावना वारंवार होत असेल तर ती कोलनमधील अडथळा किंवा गाठीचे संकेत असू शकते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

  • 6/7

    शौचाच्या सवयींमध्ये बदल: अचानक पोट साफ होण्याची पद्धत बदलणे, सतत बद्धकोष्ठता, अतिसार किंवा शौचाच्या घट्टपणात बदल हे काही आठवड्यांपर्यंत कायम राहिल्यास तपासणी आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

  • 7/7

    वजनात अचानक घट: आहार किंवा व्यायाम न बदलता वजन जलद गतीने कमी होणं हे शरीरात काही गंभीर आजार चालू असल्याचं संकेत असू शकतं. हे कोलन कॅन्सरचंही महत्त्वाचं लक्षण आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Early warning signs of colon cancer symptoms seen during bowel movements and digestive changes svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.