-
'गणपत्ती बाप्पा मोरया.. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी..' अशा जयघोषात ठाण्यातील लोकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. (छाया- दीपक जोशी)
-
कल्याण, उल्हासनगर, वसई, नवीन पनवेल, रायगड आणि अलिबाग येथील नऊ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्तम रंगाविष्कार सादर करून परीक्षकांवर आपली छाप उमटविली. (छाया- दीपक जोशी)
-
एकाहून एक दर्जेदार एकांकिका.. उत्कृष्ट लेखन, जोशपूर्ण सादरीकरण, नावीन्यपूर्ण मांडणी या सगळ्याला नृत्य आणि संगीताची अनोखी जोड देत येथील तरुणाईने आपल्या अभिजात नाटय़कलेचे दर्शन घडविले. (छाया- दीपक जोशी)
-
ठाण्याच्या एकांकिका स्पर्धेत जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या 'मॉब' एकांकिकेने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. ४५ रंगकर्मी आणि २० हून अधिक बॅकस्टेज आर्टिस्ट यांचा लवाजमा या ठिकाणी उपस्थित होता. एकीकडे 'मॉब' एकांकिकांची संकल्पना कालबाह्य़ होत असताना या एकांकिकेने लक्ष वेधून घेतले. (छाया- दीपक जोशी)
-
या एकांकिकेची नेपथ्य रचनाही नजरेत भरणारी होती. नेपथ्य करण्यासाठी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर साहित्य आणण्यात आले होते. त्यासाठी विशेष हमालांची व्यवस्थाही महाविद्यालयातर्फे करण्यात आली होती. (छाया- दीपक जोशी)
-
दिवसभरात वेगवेगळ्या एकांकिका आणि त्यातील तरुण कलाकारांचा असाच दांडगा उत्साह दिसून आला. (छाया- दीपक जोशी)
-
उत्स्फूर्त उत्साहाने भारावलेले वातावरण, मंचावर एकांकिका सादर करण्यापूर्वी सर्वच संघांची सुरू असलेली लगबग आणि सगळ्या संघांमध्ये आपली एकांकिका सरस ठरावी यासाठी लागलेली चुरस असा वेगळाच रंग या फेरीला चढला होता. (छाया- दीपक जोशी)
-
ठाणे शहराचे आकर्षण असणाऱ्या मासुंदा तलाव अर्थात तलावपाळी परिसरात असलेल्या 'मो. ह. विद्यालया'मध्ये लोकांकिकाची प्राथमिक फेरी रंगली होती. (छाया- दीपक जोशी)
प्राथमिक फेरी – ठाणे विभाग
Web Title: Loksatta lokankika photo gallery