-
अयोध्येमध्ये दरवर्षी विविध पद्धतीने दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. या वर्षी नगरीत २४ लाख दिवे लावून मागील वर्षीचा १५.७६ लाख दिव्यांचा विक्रम मोडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि भारतातील ४१ देशांच्या दूतावासातील प्रतिनिधींसोबत या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस असणाऱ्या या कार्यक्रमाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. अयोध्येत सुरु असणाऱ्या दीपोत्सवाच्या तयारीचा घेतलेला हा आढावा…
-
अयोध्येमध्ये मागील वर्षी केलेला १५ लाखांहून अधिक दिवे लावण्याचा विक्रम मोडला आहे. (फोटो: पीटीआय)
-
२०२२ मध्ये, पाच मिनिटेच १५.७६ लाख दिवे लावण्यात आले होते.(फोटो: पीटीआय)
-
मागील वर्षीच्या दीपोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे होते. (फोटो: पीटीआय)
-
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीम ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने दिवे मोजणार आहे. (फोटो: पीटीआय)
-
अयोध्येत साजऱ्या होणाऱ्या या सातव्या दीपोत्सवापूर्वी सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात आली. (फोटो: पीटीआय)
-
या मिरवणुकीत रामायण, रामचरितमानस आणि विविध सामाजिक समस्यांशी निगडित अठरा झलकांचा समावेश होता. (फोटो: पीटीआय)
-
या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. (फोटो: पीटीआय)
दिवाळी २०२३ : अयोध्या उजळणार २४ लक्ष दिव्यांनी; जागतिक विक्रमासाठी सजली नगरी; पहा खास फोटो…
अयोध्येतील दीपोत्सवाची परंपरा 2017 मध्ये सुरू झाली.
Web Title: 24 lakh diyas to light up ayodhya new world record see pictures vvk