-
रामलीला हा दसऱ्याआधीच्या दिवसांत म्हणजेच नवरात्राच्या दिवसांमध्ये सादर होणारा कलाप्रकार आहे. नाट्यमय लोकनृत्य असं या कलाप्रकाराला म्हणता येईल. प्रभू रामाच्या आयुष्यावर आधारित प्रसंग आणि घटना यामध्ये गाणी, नृत्य आणि संवादांच्या स्वरुपात असतात.
-
रामलीला सादर करण्याची सुरुवात १६ व्या शतकात झाली. प्राचीन भारताच्या इतिहासात डोकावल्यानंतर ही बाब समोर येते. तुलसीदासांनी रामचरितमानस रचलं त्यानंतर ही परंपरा सुरु झाल्याचं इतिहास सांगतो
-
रामलीला सादर करत असताना त्यात कलाकार राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण अशी पात्रं रंगवतात. लोकसंगीत, ढोलकी आणि इतर पारंपारिक वाद्यं वाजवून ही कला सादर केली जाते.
-
रामलीला उत्सव हा खुल्या हवेत आणि मोकळ्या मैदानावरील रंगमंचावर सादर केली जाते. संस्कृती आणि भक्ती यांचा एक उत्तम उत्सव म्हणून रामलीला या नाट्याकडे पाहिलं जातं.
-
संभारतातल्या जवळपास प्रत्येक राज्यात रामलीला सादर केली जाते. या सादरीकरणाची शैली वेगवेगळी असते. लहान गावांपासून अगदी मोठ्या शहरांपर्यंत अनेक भागांमध्ये रामलीला सादर होते.
-
रामलीला पारंपरिक कथा सांगण्याची पद्धत, संस्कृती आणि भारताचा समृद्ध वारसा जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मागच्या चारशे वर्षांपासून रामलीलेची परंपरा भारतात कायम आहे.
रामलीला सादर करण्यास कधी सुरुवात झाली? संस्कृती आणि परंपरा यांचा मिलाफ कसा झाला?
नवरात्रीमध्ये रामलीला ही एक कालातीत परंपरा आहे. चला, रामलीलेबद्दलच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी थोडा वेळ काढूया.
Web Title: Ramlila a timeless tradition marathi news iehd import scj