• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. loksatta oratory competition final round

वक्ता दशसहस्रेषु!

February 15, 2016 20:15 IST
Follow Us
  • विषयांची वैविध्यता, तुडुंब भरलेले सभागृह आणि राज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकत महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आठ वक्ते.. अशा भारलेल्या वातावरणात रविवारी रवींद्र नाटय़ मंदिरात ‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा सोहळा रंगला. (छाया- दिलीप कागडा)
    1/

    विषयांची वैविध्यता, तुडुंब भरलेले सभागृह आणि राज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकत महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आठ वक्ते.. अशा भारलेल्या वातावरणात रविवारी रवींद्र नाटय़ मंदिरात ‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा सोहळा रंगला. (छाया- दिलीप कागडा)

  • 2/

    राज्यभरातील आठ शहरांमधून आलेल्या स्पर्धकांमधून ‘वक्ता दशहस्रेषु’ निवडणाऱ्या या स्पध्रेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले विषय हे त्यांच्या रोजच्या जगण्यातीलच असले तरी ते सोपे नव्हते. त्यामुळे विषयांची मांडणी करताना साहजिकच पुस्तकी संदर्भाच्या पलिकडे जात विद्यार्थ्यांना विचार करावा लागला हे त्यांच्या भाषणातून उपस्थितांनाही जाणवले. (छाया- दिलीप कागडा)

  • 3/

    महाराष्ट्राचा वक्ता दशहस्रेषु ठरण्यासाठी आठ वक्त्यांमध्ये रंगलेल्या चुरशीत अखेरीस बाजी मारली नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विवेक चित्ते याने. (छाया- दिलीप कागडा)

  • 4/

    रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचा ऋषिकेश डाळे स्पर्धेचा उपविजेता ठरला. पनवेलच्या पिल्लई कॉलेज ऑफ आर्टस्च्या रिद्धी म्हात्रेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. (छाया- दिलीप कागडा)

  • ‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेचे विजेते. (छाया- दिलीप कागडा)
  • 5/

    या सोहळ्याला ‘राशीचक्र’ कार शरद उपाध्ये आणि अभिनेता व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि कवयित्री नीरजा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. (छाया- दिलीप कागडा)

  • अंतिम फेरीसाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. (छाया- दिलीप कागडा)
  • 6/

    लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका मांडताना. (छाया- दिलीप कागडा)

  • या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून बोलताना 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये. (छाया- दिलीप कागडा)
  • 7/

    विवेक चित्ते, नाशिक (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) : प्रथम पारितोषिक

  • 8/

    लालित्यपूर्ण, शैलीदार वक्तृत्वासाठी प्रा. वसंत कुंभोजकर पुरस्कार : ऋषिकेश डाळे, रत्नागिरी

  • 9/

    रिद्धी म्हात्रे, ठाणे (पिल्लई कॉलेज ऑफ कॉमर्स, पनवेल) : तृतीय पारितोषिक

  • 10/

    भुवनेश्वरी परशुरामकर, नागपूर (मॉरिस महाविद्यालय) : उत्तेजनार्थ

  • 11/

    आदित्य जंगले, मुंबई (रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा) : उत्तेजनार्थ

Web Title: Loksatta oratory competition final round

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.