-
दहावीची परीक्षा म्हणजे, आयुष्यातली पहिली कसोटी. शाळेच्या चार भिंतींमध्ये मजामस्ती करणारे मित्र-मैत्रिणी, शिक्षणासोबत संस्काराचे धडे देणारे शिक्षक, घराइतकाच प्रिय असलेला वर्ग अशा सुखकर विश्वातून विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल बाहेर पडतं ते या परीक्षेतूनच. शैक्षणिक कारकीर्दच नव्हे तर अवघ्या आयुष्याला आकार देणाऱ्या या परीक्षेचं महत्त्व ओघाने येतंच. पण तरीही आसपासचा प्रत्येक जण वेळोवेळी ते महत्त्व अधोरेखित करीत असतो. पहिल्या पेपरच्या दिवशी मित्रमंडळी, कुटुंब, आप्तेष्ट यांच्यासोबत अगदी वृत्तपत्रांतूनही होणारा ‘ऑल द बेस्ट’चा घोष हे दडपण आणखी वाढवतो. या सगळय़ा गोष्टींमुळे परीक्षा केंद्रातील आपल्या खोलीत पोहोचेपर्यंत विषयाची उजळणी सुरूच असते. परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंतचा प्रवासही उजळणीतच जातो आणि तेथे पोहोचल्यानंतरही ओळखी-अनोळखी परीक्षार्थीसोबत ‘काही राहिलं तर नाही ना’ याचीच चर्चा सुरू असते. पण जशी परीक्षेची घंटा वाजते, तसं सारं वातावरण चिडीचूप होऊन जातं. तीन तासांचा तो पहिला पेपर संपून बाहेर आल्यानंतर ‘अरेच्चा, इतकं काही कठीण नाही!’ याची जाणीव होते आणि सकाळपासून ताणलेले दिसणारे चेहरे ‘ऑल इज वेल’ म्हणत म्हणत घराकडे परततात. (छाया- गणेश जाधव)
-
पालकांचा आशिर्वाद घेताना दहावीचा विद्यर्थी. (छाया- गणेश जाधव)
-
दुचाकीवरून परिक्षा केंद्रावर जाताना अभ्यास करताना दहावीचा विद्यार्थी. (छाया- गणेश जाधव)
-
दुचाकीवरून परिक्षा केंद्रावर जाताना अभ्यास करताना दहावीचा विद्यार्थी. (छाया- गणेश जाधव)
-
दहावीच्या परिक्षेला सुरुवात. (छाया- गणेश जाधव)
-
ऑल द बेस्ट.
-
-
परिक्षेपूर्वी एकमेकांना शुभेच्छा देणारे दहावीचे विद्यार्थी. (छाया- गणेश जाधव.)
-
दहावीच्या परिक्षेला सुरूवात. (छाया- गणेश जाधव.)
-
परिक्षेचा काळ आणि उन्हाची रखरख. (छाया- गणेश जाधव.)
तो बोलो, ‘ऑल इज वेल’!
दहावीची परीक्षा म्हणजे, आयुष्यातली पहिली कसोटी. शाळेच्या चार भिंतींमध्ये मजामस्ती करणारे मित्र-मैत्रिणी, शिक्षणासोबत संस्काराचे धडे देणारे शिक्षक, घराइतकाच प्रिय असलेला वर्ग अशा सुखकर विश्वातून विद्यार्थ्यांचं पहिलं पाऊल बाहेर पडतं ते या परीक्षेतूनच.
Web Title: Ssc board exam