-
डेहराडूनमध्ये एका निषेध मोर्चाच्या वेळी भाजप आमदार गणेश जोशी यांनी केलेल्या मारहाणीत पाय गमवावा लागलेल्या शक्तिमान या अश्वाचा बुधवारी मृत्यू झाला.
-
‘शक्तिमान’ १४ मार्च रोजी जखमी झाल्यावर त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्याला कृत्रिम पायही बसविण्यात आला होता. मात्र, तो या दुखापतीतून पूर्ण सावरू शकला नाही, अशी माहिती डेहराडूनचे पोलीस अधीक्षक सदानंद दाते यांनी दिली आहे.
-
शक्तिमानच्या मृत्यूने धक्का बसल्याची भावना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी व्यक्त केली आहे.
-
शक्तिमान शूर योद्धा होता आणि कर्तव्य बजावत असतानाच त्याच्यावर भ्याड हल्ला झाला.
-
तेरा वर्षीय ‘शक्तिमान’ उत्तराखंड पोलीस दलातील प्रशिक्षित अश्व होता.
-
या प्रकरणात गणेश जोशी यांना अटकही करण्यात आली होती.
-
डेहराडूनमध्ये एका निषेध मोर्चाच्या वेळी भाजप आमदार गणेश जोशी यांनी केलेल्या मारहाणीत पाय गमवावा लागलेल्या शक्तिमान या अश्वाचा बुधवारी मृत्यू झाला.
‘शक्तिमान’चा मृत्यू
Web Title: Shaktiman dies rawat pays tribute