-
भारत भेटीवर आलेले 'अॅपल' कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) टीम कूक यांच्यासाठी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या घरी खास डिनर पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी टीम कूक यांची भेट घेण्यासाठी शाहरुखच्या घरी अनेक बॉलीवूडकरांनी उपस्थिती लावली. (ट्विटर)
-
अॅपलचे सीईओ टीम कूक यांच्यासाठी शाहरुख खानने आपल्या घरी डिनर पार्टी ठेवली होती. या पार्टीनंतर उपस्थितांनी टीम कूक यांच्यासोबत एक छायाचित्र देखील टीपले. (छाया- ट्विटर)
-
टीम कूक यांच्यासोबत शाहरुख खान आणि महानायक अमिताभ बच्चन. (छाया- ट्विटर)
-
शाहरुखच्या घरी डीनर पार्टी दरम्यान बिग बींनी टीपलेला सेल्फी. (छाया- ट्विटर)
-
मुकेश भट आणि टीम कूक. (छाया- वरिन्दर चावला)
-
टीम कूक यांची गळाभेट घेताना मुकेश भट (छाया- ट्विटर)
-
इमरान हाश्मी, मुकेश आणि महेश भट टीम कूक यांच्यासोबत एक व्हिडिओ पाहताना. (ट्विटर)
-
महेश भट यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर देखील टीम कूक यांनी उपस्थिती लावली. (ट्विटर)
-
संगीतकार ए.आर.रेहमान देखील टीम कूक यांची भेट घेण्यासाठी आवर्जुन उपस्थित होता. (ट्विटर)
-
माधुरी आणि तिचे पती डॉ. नेने यांचा टीम कूक यांच्यासोबतचा सेल्फी. (ट्विटर)
-
टीम कूक यांच्यासोबत शाहरुख आणि फराह खानचा सेल्फी. (छाया- ट्विटर)
-
अभिनेता आमीर खान देखील टीम कूक यांची भेट घेण्यासाठी शाहरुखच्या घरी उपस्थित होता. (छाया- वरिन्दर चावला)
-
चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक फरहान खान आणि टेनिसपटू सानिया मिर्झा देखील शाहरुखच्या घरी टीम कूक यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होत्या. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील उपस्थित होती. (वरिन्दर चावला)
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील उपस्थित होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
शाहरुखच्या घरी डिनर पार्टीसाठी टीम कूक दाखल झाले तेव्हा. (छाया- वरिन्दर चावला)
-
टीम कूक यांची भेट घेण्यासाठी शाहरुखच्या घरी जाताना महानायक अमिताभ बच्चन. (छाया- वरिन्दर चावला)
Apple CEO Tim Cook: शाहरुखच्या घरी ‘अॅपल’चे ‘सीईओ’
भारत भेटीवर आलेले ‘अॅपल’ कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्यासाठी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या घरी खास डिनर पार्टीचे आयोजन केले होते.
Web Title: Tim cook dinner party at shah rukh khan bungalow aishwarya aamir big b madhuri are special guests