-
म्हैसूरच्या वाडियार राजघराण्यातील राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी राजस्थानमधील डूंगपुरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत लग्नगाठ बांधली. म्हैसूरच्या ऐतिहासिक आंबा विला पॅलेसमध्ये सोमवारी हा शाही लग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रमास रविवारपासूनच सुरुवात झाली होती. २४ वर्षीय यदुवीर यांनी बोस्टनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. अलीकडेच अमेरिकेतून भारतात परतलेल्या त्रिशिकानेदेखील अमेरिकेतून शिक्षण पूर्ण केले आहे. त्रिशिका डूंगपुरचे राजा हर्षवर्धन सिंह यांची मुलगी आहे. ४० वर्षांनी वाडियार राजघराण्याने लग्नसोहळा अनुभवला. (Photo Source: Facebook)
-
अनेक राजकीय नेतेमंडळी तसेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या लग्नसोहळ्यास उपस्थित होत्या. एक हजारांहून अधिक लोकांना या शाही लग्नसोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. पुढील स्लाइडमध्ये शाही लग्नसोहळ्याची छायाचित्रे पाहता येतील. (Photo Source: Facebook)
-
लग्नातील धार्मिकविधी करताना यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार(Photo Source: Facebook)
-
लग्नसोहळ्यादरम्यान कुटुंबीय आणि गुरुजींसमवेत कृष्णदत्त चामराजा वाडियार (Photo Source: Facebook)
-
कृष्णदत्त चामराजा वाडियार आणि त्रिशिका (Photo Source: Facebook)
-
कृष्णदत्त चामराजा वाडियार आणि त्रिशिका (Photo Source: Facebook)
-
नवरदेव कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना वरमाळा घालताना त्रिशिका (Photo Source: Facebook)
-
शाही लग्नसोहळा : वाडियार राजघराण्यात ४० वर्षांनी वाजले सनईचे सूर
Web Title: Mysore royal wedding yaduveer krishnadatta chamaraja wadiya weds trishika at amba vilas palace