• English
• தமிழ்
• বাংলা
• മലയാളം
• ગુજરાતી
• हिंदी
• मराठी
• Business
• बिज़नेस
Loksatta
Newsletters
• Whatsapp
• Facebook
• Youtube
• Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
• होम
• ईपेपर
• महाराष्ट्र
• शहर
• देश-विदेश
• क्रीडा
• सत्ताकारण
• विश्लेषण
• हेल्थ
• अर्थभान
• करिअर
• राशिभविष्य
• मनोरंजन
• ट्रेंडिंग
• विचारमंच
• चतुरा
• फोटो
• ट्रेंडिंग
• Subscribe at Rs 699
• लोकसत्ता प्रीमियम
• देवेंद्र फडणवीस
• उद्धव ठाकरे
• Sudoku
• आजचा जोक
• Stock Market
1. Marathi News
2. Photos
3. news
4. mumbai island british fort
मुंबई बेटावरचा ब्रिटिश किल्ला – निर्मिती आणि अखेर
July 15, 2016 15:23 IST
Follow Us
• मुंबई किल्ल्याची तटबंदी व चर्चगेट पाडल्यानंतर चर्चगेटच्या जागेवर बांधलेले फ्लोरा फाउंटन.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या सात बेटांच्या समूहाने म्हणजे मुंबईने शेकडो वर्षांपासून देशी व परदेशी राज्यकर्त्यांना आकर्षित केले होते. कुलाबा-धाकटा कुलाबा- मुंबई- माझगांव- परळ- वरळी व माहीम अशा या सात बेटांवर मूळ वस्ती फक्त कोळी, भंडारी व आगरी लोकांची होती. (सौजन्य – लोकप्रभा)
• चर्चगेट स्टेशनबाहेरील लेव्हल क्रॉसिंग. मागे हायकोर्ट व राजाभाई टॉवर.
गुजराथमधील चंपानेरमधून दक्षिणेकडील प्रदेश जिंकत जिंकत येथवर आलेल्या राणा प्रताप बिंबाने मोक्याच्या माहीम बेटावर इ.स. ११४० ते १२४१ दरम्यान मोठा मजबूत दगडी किल्ला बांधला. त्यानंतर इ.स. १३४८ मध्ये येथे घुसलेल्या मुगलांनी काही व १५३४ मध्ये मोगलांना हटवून मुंबई बळकावलेल्या पोर्तुगीजांनी काही बेटांवर किल्ले बांधले. (सौजन्य – लोकप्रभा)
• अपोलो गेट व तटबंदीबाहेरचा पाण्याने भरलेला खंदक
मात्र नंतर त्यांनी राजघराण्यांतील सोयरिकीमुळे मुंबई बेट ब्रिटिशांना १६६१ मध्ये आंदण दिले व ते प्रत्यक्ष हस्तांतरित होण्याची प्रक्रिया १६६५ मध्ये पूर्ण झाल्यावर येथे आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व नंतर यथावकाश इंग्लंडच्या राणीचा राज्यकारभार सुरू झाला. मुंबईचे खरे महत्त्व ब्रिटिशांनीच ओळखले होते. (सौजन्य – लोकप्रभा)
• १८३८ मध्ये बांधलेला, मुंबई व कुलाबा बेटे जोडणारा कुलाबा कॉजवे. मागे सेंट अँड्रय़ूज चर्च.
वर उल्लेख केलेल्या मुंबईच्या सात बेटांपैकी फक्त मध्ये असलेले मुंबई बेट क्षेत्रफळाने मोठे होते. त्यामुळे त्यावर वस्ती करणे ब्रिटिशांना जास्त सोयीचे होते. येथूनच वस्ती व कारभार करताना त्यांनी प्रशस्त व प्रचंड मोठा किल्ला येथे उभारला. तथापि काही काळानंतर त्यांनीच तो पाडूनही टाकला. त्याच किल्ल्याबद्दलची ही माहिती… (सौजन्य – लोकप्रभा)
• बझारगेटचे तीन दरवाजे, तटबंदी व खंदक.
मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर इ.स. १५३८ च्या आसपास ज्याला मुंबई बेट पोर्तुगीजांनी भाडय़ाने दिले होते, त्या मार्सिया दा ओर्ता या शास्त्रज्ञाने मॅनॉर हाऊस या नावाचा बंगला बांधला. त्या बंगल्यात १६२६ नंतर पोर्तुगीज गव्हर्नर राहात असे. नंतर १६६५ मध्ये तेथे ब्रिटिश गव्हर्नर राहाण्यास आला. (सौजन्य – लोकप्रभा)
• किल्ल्याच्या पश्चिम भिंतीतील चर्चगेट, मागे वस्ती, थॉमस चर्च व बाहेरील खंदक
दि. ३, ४ व ५ ऑक्टोबर १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटून साफ केली. त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांची हायच खाल्ली. १७१५ मध्ये नियुक्ती झालेल्या चार्ल्स बून या गव्हर्नरने तोपर्यंत विस्तारलेल्या शहराभोवती उंच, रुंद व भक्कम भिंती बांधून त्याला किल्ल्याचे स्वरूप आणले. (सौजन्य – लोकप्रभा)
• कुलाबा स्टेशनची देखणी इमारत, १९३७ मध्ये जमीनदोस्त. आता तेथे बधवार पार्क आहे.
या किल्ल्याच्या पूर्व बाजूस समुद्र असल्याने तेथून दोन दरवाजे होते, त्यांना मरीन गेट असे म्हणत. उत्तरेच्या भिंतीत, दक्षिणोत्तर बझारगेट स्ट्रीटच्या उत्तर टोकास बझारगेट या नावाचा तिहेरी दरवाजा होता. त्याला तीन दरवाजा असेदेखील म्हणत. पश्चिमेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलजवळील सेंट थॉमस चर्चकडून सरळ पश्चिमेस जाणाऱ्या रस्त्यावर तो दरवाजा होता, त्याला चर्चगेट असे नाव होते व त्या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे म्हणत. (सौजन्य – लोकप्रभा)
• बॉम्बे कॅसलच्या तटबंदीवरचा टेहेळणी मनोरा. हा भाग नेव्हीच्या ताब्यात आहे.
किल्ल्याबाहेर पडल्यावर हीच चर्चगेट स्ट्रीट पुढे पश्चिमेकडे गेल्यावर इ.स. १८६७-७२ च्या आसपास उत्तरेकडून आलेल्या व कुलाब्यापर्यंत जाणाऱ्या बीबीसीआय रेल्वेला तिने जेथे छेदले तेथील स्टेशनला चर्चगेट असे नाव दिले व तेच अजून प्रचारात आहे. (सौजन्य – लोकप्रभा)
• हॉर्निमन सर्कल व टाऊन हॉल. याच्या मागे ताडाचे झाड व तेथे बॉम्बे कॅसल आहे.
मूळचा चर्चगेट दरवाजा कधीच इतिहास जमा झाला! चर्चगेट स्ट्रीटने रेल्वेला जेथे छेदले तेथे लेव्हल क्रॉसिंग होते. रेल्वे कुलाब्यापर्यंत जात होती व शेवटचे स्टेशन ही फार देखणी इमारत होती. १९३० नंतर रेल्वे चर्चगेटपुढचे कुलाब्यापर्यंतचे रूळ तोडले, १९३७ मध्ये कुलाबा स्टेशन पाडले व स्टेशनच्या जागेत १९५० नंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी फ्लॅट्स बांधून ‘बधवार पार्क’ निर्माण केले. (सौजन्य – लोकप्रभा)
• ब्रिटिशांनी तयार केलेल्या ‘प्लॅन ऑफ फोर्ट अँड एस्प्लनेड ऑफ बॉम्बे, १८२७’ चा संदर्भ घेऊन, १९४२ ची मुंबई दाखवणाऱ्या स्वत:कडील नकाशावर लेखिकेने मुंबई फोर्टचे अंदाजे अध्यारोपण केले आहे.
लेखक – उज्ज्वला आगासकर, (ऋणनिर्देश- * Survey of India कृत Bombay Guide Map including Part of Salsotte, 1942. * Plan of The Fort and Esplanade of Bombay, 1827; * Bombay, The Cities Within ; * लेखक- शारदा द्विवेदी. राहुल मेहरोत्रा; * मुंबईची आभूषणे- सभोवतालचे किल्ले, लेखक- सुहास सोनावणे; * ‘शोध’ , लेखक- मुरलीधर खरनार.)
Web Title: Mumbai island british fort
Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.