• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. diamond art on ganesh idols

हिरेजडित मुकुट शोभतो बरा…

August 29, 2016 15:00 IST
Follow Us
    • अवघ्या काही दिवसांवर येउन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या घरगुती आणि मोठमोठ्या गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरत आहे. गणपतीच्या पितांबराच्या रंगापासून ते अगदी बिकबाळीच्या नव्या डिझाईनपर्यंतचा सारा घाट घालण्यासाठीच अनेकांची लगबग सुरु आहे. (छाया सौजन्य- 'विघ्नहर्ता आर्ट्स': तन्मय सावंत, प्रवीण कदम, ओंकार बिर्जे )
    • 1/

      दर दिवसाआड येणाऱ्या नवनवीन ट्रेंडच्या या जमान्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीवरही अशीच हिरेजडित झाक चढवण्याकडे हल्ली अनेकांचाच कल आहे.

    • 2/

      सर्वांच्याच लाडक्या बाप्पाच्या मूर्तीला अधिक विलोभनीय व मोहक बनवण्यासाठी काही कलाकार मंडळी आपल्या हातांची जादू या मूर्तीवर करतात. कारण सबंध मूर्तीत विशेष लक्षवेधी ठरते ती म्हणजे बाप्पाची हिरेजडित सजावट.

    • 3/

      मोती, काच, कुंदन, अॅक्रॅलिक, विविधरंगी खडे आणि त्यापासून विशेष रंगसंगती साधत साकारल्या जाणाऱ्या इमिटेशन ज्वेलरीकडे अनेक गणेशभक्तांचा ओढा आहे.

    • 4/

      गणेशमूर्तीच्या रत्नजडित सजावटीच्या याच धर्तीवर गणेशोत्सवाचं माहेरघर असणाऱ्या परळ-लालबागमध्ये आकारास आलं आहे ‘विघ्नहर्ता आर्ट्स’.

    • 5/

      घरगुती गणपतींसमवेतच परळचा राजा- नरेपार्क, काळाचौकीचा महागणपती, खेतवाडी २-३, गणेशगल्ली, बोरिवली उपनगरचा राजा, ताडदेवचा राजा, अशा नावाजलेल्या मंडळांच्या गणेशमूर्तीना हिरेजडित साज चढवण्याचं नियमित काम 'विघ्नहर्ता आर्ट्स' करीत आहे.

    • 6/

      मुर्तींवर ही नोहक कलाकुसर करणारे कलाकार त्यांच्या कलात्मकतेने इतरांची मने जिंकत आहे. मूर्तीची धाटणी, एकंदर रंगसंगती पाहून विविध आकारांतील, रंगांतील हिऱ्यांची अचूक निवड करून देखणी व नक्षीदार कलाकृती साधायलाही खूप कसब व एकाग्रता लागते.

    • मूर्ती जितक्या भव्य तितकीच त्यांच्या सजावटीच्या कामात सावधगिरी बाळगावी लागते.
    • डिझाइन ठरवण्यापासून ती अंतिम टप्प्यात पोहोचेपर्यंत ह्य़ा कलाकारांच्या मनात धास्ती असते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यावर तर दिवस-रात्र एक करून ही मंडळी अक्षरश: स्वत:ला या कामात झोकून देतात.
    • 7/

      सरते शेवटी मुर्ती गणेश चित्रशाळेतून बाहेर येताच त्याची एक झलक कॅमेरात चिपण्यासाठी गर्दी करणाऱ्या छायाचित्रकारांच्या उत्सुकतेमध्येच या सजावटकारांचा आनंद सामावलेला असतो.

Web Title: Diamond art on ganesh idols

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.