• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ganesh immersion at girgaon chowpatty

पुढच्या वर्षी लवकर या…

September 16, 2016 05:50 IST
Follow Us
  • महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून ख्याती असलेल्या गणरायाला गुरूवारी मुंबईकरांनी वरूणराजाच्या साथीने भावपूर्ण निरोप दिला. (छाया- प्रदीप दास)
    1/

    महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणून ख्याती असलेल्या गणरायाला गुरूवारी मुंबईकरांनी वरूणराजाच्या साथीने भावपूर्ण निरोप दिला. (छाया- प्रदीप दास)

  • 2/

    हवामान खात्याने भाकित वर्तविल्याप्रमाणे मुंबई आणि परिसरात पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, तरीही बाप्पांना निरोप देताना मुंबईकरांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही. छाया- प्रदीप दास)

  • 3/

    गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर जनसागर उसळला होता. छाया- प्रदीप दास)

  • 4/

    गिरगाव चौपाटीसह मुंबईच्या सहा चौपाट्यांवर घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनसाठी जनसागर उसळला होता. छाया- प्रदीप दास)

  • 5/

    सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, लालबागचा राजा, तेजुकायाचा बाप्पा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळीचा गणपती या मुंबईतील मानाच्या गणपतींनी निरोप देण्यासाठी लालबाग-परळ परिसरात मोठा जनसमुदाय जमला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 6/

    बाप्पाचे रूप डोळ्यात साठविण्यासाठी पावसाची तमा न बाळगता अनेकजण रस्त्याच्या दुतर्फा उभे असल्याचे चित्र दिसत होते. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 7/

    विसर्जन मिरवणुकीत बेभान होऊन नाचताना गणेशभक्त. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 8/

    लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगजवळ या मानाच्या गणपतींवर पुष्पवृष्टी करण्यात आल्यानंतर या मिरवणुका गिरगाव चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 9/

    गिरगाव चौपाटीजवळ गिरगावचा राजा, गिरणगावचा राजा, काळाचौकीचा महाराजा, चंदनवाडीचा राजा, खेतवाडीचा महाराजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींना पाहण्यासाठीही लोकांनी मोठी गर्दी केली होती.

  • 10/

    मुंबईत ७२ नैसर्गिक आणि २६ कृत्रिम स्थळांवर मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 11/

    काश्मिरमधील तणावग्रस्त परिस्थिती आणि पुण्यातील दहशतवादी कारवायांची शक्यता लक्षात घेऊन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 12/

    मुंबईतील सुमारे ५० हजार पोलिस यावेळी बंदोबस्ताकरिता रस्त्यावर तैनात करण्यात आले होते.

  • प्रमुख चौपाटय़ांवर टेहळणीकरता पोलिसांकडून ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विसर्जन मिरवणुकांवरही सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस लक्ष ठेवून होते. (छाया- गणेश शिर्सेकर)
  • 13/

    गणेशमूर्ती विसर्जनासाठी खोल समुद्रात नेल्या जात असताना. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 14/

    गिरगाव चौपाटीवर विसर्जनसाठी दाखल झालेली गणरायाची सुबक मूर्ती. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • श्रीगणेशाचे मोहक रूप. (छाया- गणेश शिर्सेकर)
  • 15/

    गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झालेल्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 16/

    गिरगाव चौपाटीजवळ गिरगावचा राजा, गिरणगावचा राजा, काळाचौकीचा महाराजा, चंदनवाडीचा राजा, खेतवाडीचा महाराजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्तींना पाहण्यासाठीही लोकांनी मोठी गर्दी केली होती.

  • 17/

  • 18/

    सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात नेली जात असताना. (छाया- गणेश शिर्सेकर)

  • 19/

    लाडक्या बाप्पाला निरोप देताना मंडळाचे कार्यकर्ते. (छाया- गणेश शिर्सेकर)

Web Title: Ganesh immersion at girgaon chowpatty

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.