-
‘ड्रीम क्रूझ’ मुंबईत दाखल
-
या क्रूझने मुंबई ते सिंगापूर प्रवासासाठी ७० हजार रुपये मोजावे लागणार असल्याचे क्रूझच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे झालेल्या या कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया उपस्थित होते.
-
मुंबईच्या समुद्रात प्रथमच अशा प्रकारची क्रूझ बोट दाखल झाली आहे.
-
या सप्ततारांकित क्रूझची एकूण प्रवासी क्षमता ४ हजार असून यामधून २ हजार प्रवासी सफरीला निघणार आहेत.
-
‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या आखत्यारीत सध्या बंदरात जहाजे उभी करण्यासाठी ७ मोठे ‘बर्थ’ असून यांचा वापर मुख्यत्वे मालवाहू जहाजांच्या आगमन व प्रस्थानासाठी करण्यात येत आहे. मात्र येथे येणाऱ्या मालवाहू जहाजांकडून ज्यादा महसूल मिळत असल्याने प्रवासी क्रूझ बोटींना दुय्यम स्थान दिले जात असे.
-
‘आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटना’ला चालना मिळण्यासाठी ट्रस्टने एक मोठे ‘बर्थ’ बडय़ा क्रूझ बोटींसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना भराव्या लागणाऱ्या दरात ४० टक्के कपात केली आहे.
-
२ एकराच्या जागेत एक मोठे अत्याधुनिक क्रूझ टर्मिनल बनवण्यात येत असून यासाठी १३० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तसेच येत्या डिसेबरपासून मुंबईतूनच जगातील अन्य देशांसाठी क्रूझ सेवा सुरू होणार असून त्या मुंबईहून निघून पुन्हा मुंबईत येणार आहेत.
-
या ऑक्टोबर ते मे महिन्यांदरम्यान ‘गेंटिंग ड्रीम’ एवढय़ाच मोठय़ा ५९ क्रूझ मुंबईत येणार असून नजीकच्या वर्षांत अशा १०० क्रूझ येण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.
-
संपूर्ण देशातच क्रूझ पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर एका समितीची स्थापना करण्यात आली असून यात मुंबई, कोचिन, गोवा येथील पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांचा समावेश आहे.
-
युतीच्या काळात क्रूझ पर्यटन सुरळीत झाले असून येत्या काही वर्षांत क्रूझ पर्यटनाची राजधानी अशी मुंबईची ओळख बनविण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने मुंबईतील बंदराचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
-
मुंबईची ओळख सध्या ‘गेट वे ऑफ क्रूझ टूरिझम’ अशी होत असून राज्य शासनामार्फतही राज्यातील बंदरांचा विकास करुन येथे जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पंचतारांकीत ‘ड्रीम क्रूझ’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
‘ड्रीम क्रूझ’ मुंबईत दाखल
Web Title: Genting dream 18 deck luxury cruise liner drops anchor in mumbai