-
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. (छाया-पीटीआय)
-
इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे जगातील अनेक देशांचे लक्ष लागले होते. अखेर आपल्या लौकिकाला जागत इस्रोने 'न भूतो न भविष्यती' अशी कामगिरी करून दाखविली. (छाया-पीटीआय)
-
आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ प्रक्षेपक सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी आकाशात झेपावला. (छाया-पीटीआय)
-
उड्डाणापासून ते अंतराळाच्या कक्षेत उपग्रह वेगळे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात आखल्याप्रमाणे सर्वकाही व्यवस्थित पार पडले आणि इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. (छाया-पीटीआय)
-
भारताने आतापर्यंत १८० उपग्रह अवकाशात सोडले आहेत. यामध्ये अमेरिकेच्या सर्वाधिक ११४ उपग्रहांचा समावेश आहे. यासोबतच कॅनडाचे ११, जर्मनीचे १०, सिंगापूरचे ८, ब्रिटनचे ६, अल्जेरियाचे ४, इंडोनेशिया, जपान आणि स्वित्झलँडचे प्रत्येकी ३, इस्राईल, नेदरलँड, डेन्मार्क, फ्रान्स, ऑस्ट्रियाचे प्रत्येकी २, कोरियन प्रजासत्ताक, बेल्जियम, अर्जेंटिना, इटली, तुर्कस्तान, लक्झमबर्ग, युएई आणि कजाकिस्तानच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा समावेश आहे. (छाया-पीटीआय)
-
बुधवारी भारताने अवकाशात सोडलेल्या १०४ उपग्रहांपैकी फक्त ३ उपग्रह भारतीय होते, तर इतर उपग्रह परदेशांचे होते. इतर देशांचे १०१ उपग्रह सोडल्यामुळे या मोहिमेचा निम्मा खर्च वसूल होईल, असा अंदाज इस्रोने व्यक्त केला आहे. (छाया-पीटीआय)
-
इस्रो सर्वाधिक परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करणारी संस्था झाली आहे. (छाया-पीटीआय)
-
या यशस्वी कामगिरीने इस्रोने यापूर्वीचा स्वत:चा एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या अमेरिका आणि रशियालाही न जमलेली कामगिरी भारताने करून दाखविली आहे. (छाया-पीटीआय)
इस्रोनं ‘करून दाखवलं!
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. (छाया-पीटीआय)
Web Title: Isro launch pslv 37 rocket 104 satel orbit a record