-
भारतात बाहेरगावच्या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये ट्रेनमधील अस्वच्छ टॉयलेट ही मुख्य समस्या आहे. परंतु लवकरच ही समस्या दूर होणार असल्याचे दिसते. विमानात ज्याप्रमाणे सुंदर टॉयलेट असते तसेच टॉयलेट आता नॉन-एसी पॅसेंजर ट्रेनमध्येदेखील देण्यात येणार आहे. (Photo Source : Indianexpress.com)
-
यासाठी कोरियामधून विशिष्ट प्रकारचे सामान आयात करण्यात आल्याची माहिती मिळते. स्टील-सिंकच्या जागी वॉशबेसिन, स्टेनलेस स्टील टॉयलेट आणि एंटी थेफ्ट फिटिंगस् लावण्यात आली आहेत. (Photo Source : Indianexpress.com)
-
टॉयलेटच्या अंतर्गत सजावटीवरदेखील विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. टॉयलेटचे फ्लोअर कमीत कमी खराब होण्याच्या दृष्टीने फ्लोअरला स्पेशल कोटिंग करण्यात आले आहे. टॉयलेटचे दरवाजेदेखील विमानातील टॉयलेटच्या धर्तीवर बनविण्यात आले आहेत. (Photo Source : Indianexpress.com)
-
सुंदरतेबरोबरच नवीन टॉयलेमध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरिअल वापरण्यात येणार आहे. Photo Source : Indianexpress.com)
-
ही टॉयलेटस् झिरो डिस्चार्ज बायो टॉयलेट असतील. अशा प्रकारच्या एका टॉयलेटच्या निर्मितीसाठी जवळजवळ साडेतीन लाख रुपये खर्च येणार असल्याचे समजते. (Photo Source : Indianexpress.com)
ट्रेनमध्ये लवकरच चकाचक टॉयलेट!
Web Title: Indian railways will soon get these aircraft like premium toilets