-
रिलायन्स जिओच्या धन-धना-धन ऑफरनंतर आता जिओच्या ४ जी फोनचं दणक्यात लाँचिंग झालं आहे. मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली आहे. हा जिओ फोन मोफत असणार आहे. पण हो, हा फोन घेताना ग्राहकांना १५०० रुपये अनामत रक्कम द्यावी लागणार आहे. तीन वर्षांनी हा फोन कंपनीला परत केल्यास ग्राहकांना अनामत रक्कम परत मिळणार आहे. रिलायन्स जिओचा हा ४ जी फोन आहे तरी कसा, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जाणून घेऊयात!
-
-
रिलायन्स जिओ कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केल्यानंतर आता स्वस्तातल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न रिलायन्सनं केला आहे. शून्य रुपयात मिळणाऱ्या या मोबाईल फोनसह लाईफटाईम फ्री कॉलिंग मिळणार आहे.
-
रिलायन्स जिओच्या ज्या फोनची वाट आतुरतेनं पाहत होते त्याचं लाँचिंग दणक्यात झालं आहे. हा फोन तब्बल २२ भाषांना सपोर्ट करणारा आहे.
-
फोन खरेदी करण्याआधी माहिती करुन घेणे गरजेचे
‘ही’ आहेत रिलायन्स जिओच्या 4G फोनची वैशिष्ट्ये
Web Title: Reliance jio 4g mobile features rilagm2017 mukesh ambani