• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. benefits of pear here are 9 reasons why the wonder fruit is good for you

Benefits of PEAR : ..हे आहेत पेर खाण्याचे फायदे

August 18, 2017 09:10 IST
Follow Us
  • फळे उत्तम आरोग्यासाठी नेहमीच उपयुक्त असतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यापैकीच एक फळ म्हणजे पेर. या फळात फायबर, इतर महत्त्वाची पोषक तत्वे आणि क्षार असतात. जर तुम्हाला फळे आणि भाज्या आवडत नसतील तर पर्याय म्हणून तुम्ही फळांच्या रसाचेदेखील सेवन करु शकता. पेर हे कमी कॅलरी असलेलं फळं असून त्यात मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. तसेच, कर्करोगापासून दूर राहण्यासही हे एक उत्तम फळ आहे. तुमच्या फलाहारामध्ये पेर असणे का गरजेचे आहे त्याची कारणे आणि फायदे पुढीलप्रमाणे.. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)
    1/

    फळे उत्तम आरोग्यासाठी नेहमीच उपयुक्त असतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यापैकीच एक फळ म्हणजे पेर. या फळात फायबर, इतर महत्त्वाची पोषक तत्वे आणि क्षार असतात. जर तुम्हाला फळे आणि भाज्या आवडत नसतील तर पर्याय म्हणून तुम्ही फळांच्या रसाचेदेखील सेवन करु शकता. पेर हे कमी कॅलरी असलेलं फळं असून त्यात मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट्स असतात. तसेच, कर्करोगापासून दूर राहण्यासही हे एक उत्तम फळ आहे. तुमच्या फलाहारामध्ये पेर असणे का गरजेचे आहे त्याची कारणे आणि फायदे पुढीलप्रमाणे.. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 2/

    पेरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि खनिजे आपल्या शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या रॅडिकल्सवर नियंत्रण ठेवते. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 3/

    पेरचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यात खनिजे असतात. जे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते आणि यामुळे हृदयविकारापासून आपले रक्षण होण्यात मदत होते. पेर खाण्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 4/

    पेरमध्ये असलेले क्षार कार्सिनोजेनिक पेशींना शरीरात पसरण्यासाठी थांबवते जेणेकरून आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यास मदत होते. मासिकपाळी बंद झालेल्या स्त्रियांनी दररोज एक पेर खाल्ल्यास स्तन कर्करोगाचा धोका ३४ टक्क्यांनी कमी होतो. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 5/

    इतर फळांच्या तुलनेत पेर खाल्ल्यास कोणतीही अॅलर्जी होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळेच लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या मोजक्या फळांमध्ये पेरचाही समावेश करण्यात येतो. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 6/

    व्हिटॅमिन सी आणि खनिजांसारखे अँटीऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जेणेकरून आपल्या शरीराला विविध रोगांविरुद्ध लढण्यासाठी चालना मिळते. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 7/

    आजकाल हाडांची समस्या खूप सामान्य आहे. हाडे निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी शरीरात pH (potential Hydrogen) आणि कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. रोज फळांचे आणि भाज्यांचे सेवन केल्यास pH चा समतोल राखण्यास मदत होते. पेरमधून सहज कॅल्शियम मिळवता येते. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 8/

    पेरमध्ये असलेले मोठ्या प्रमाणातील ग्लुकोज शरीरातील अशक्तपणा तात्काळ कमी करण्यास मदत करते. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 9/

    गरोदर स्त्रियांनी पेर खाल्ल्यास त्यातील फॉलिक अॅसिड नवजात बालकाला जन्म दोषापासून दूर ठेवते. त्यामुळे गरोदर असताना स्त्रियांनी रोज एक पेर खाणे फायद्याचे आहे. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

  • 10/

    पेरमध्ये थंडावा असल्यामुळे ताप कमी होण्यासही मदत होते. (सौजन्य : थिंकस्टॉक इमेजेस)

Web Title: Benefits of pear here are 9 reasons why the wonder fruit is good for you

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.