-
सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी आहेत. आधी रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले.
-
रेल रोकोचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
-
रेल्वेत अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत.
-
मध्य रेल्वेकडून पुरेशी माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शेवटी अनेकांनी रुळांवरुन चालतच रेल्वे स्थानक गाठले.
-
गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
-
विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी अनेकदा रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, असे एका विद्यार्थ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
-
ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शेवटी अनेकांनी रुळांवरुन चालतच रेल्वे स्थानक गाठले. या रेल रोकोचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे.
‘मरे’वर विद्यार्थ्यांचे रेल रोको, प्रवाशांचे हाल
रेल्वे परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थी रेल्वे रुळावर उतरले
Web Title: Apprentice students stage rail roko between dadar and matunga stations on central railway to protest against railway recruitment