-
दादर- मांटुगादरम्यान विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. त्यामुळे कामाला निघालेले अनेक नोकरदार रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. मात्र रेल्वे कशामुळे ठप्प आहे याबद्दलची कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात येत नव्हती. (फोटो: दिपक जोशी)
-
कल्याण स्थानकामध्ये अनेक लोकल तसेच एक्सप्रेस गाड्या अडकून पडल्या आहेत. (फोटो: दिपक जोशी)
-
सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी भरून गेले आहेत. रेल्वेने कुर्ल्यापर्यंत काही गाड्या सुरु केल्या आहेत. तर काही गाड्या कुर्ल्यावरून डाऊन दिशेने सोडण्यात आल्या आहेत. (फोटो: दिपक जोशी)
-
कल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या मोठ्या स्थानकांबरोबरच जलद आणि धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. (फोटो: निलेश पाटील)
-
शेवटी अनेकांनी रुळांवरुन चालतच रेल्वे स्थानक गाठले. या रेल रोकोचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला आहे.
-
रेल रोकोमुळे होणाऱ्या त्रासासाठी आम्ही मुंबईकरांची माफी मागतो, असेही या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
-
कल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या मोठ्या स्थानकांबरोबरच जलद आणि धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
-
कल्याण, ठाणे, डोंबिवली यासारख्या मोठ्या स्थानकांबरोबरच जलद आणि धीम्या गतीच्या रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
-
कल्याण स्थानकामध्ये अनेक लोकल तसेच एक्सप्रेस गाड्या अडकून पडल्या आहेत. (फोटो: दिपक जोशी)
मागण्यांसाठी विद्यार्थी ट्रॅकवर, प्रवासी अडकले रेल्वे स्थानकांवर
सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी भरून गेले आहेत.
Web Title: Passengers stand still on mumbai railway stations as apprentice students stage rail roko between dadar and matunga stations on central railway