-
अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी हॉलिवूडमध्ये करीयर करण्याआधी बॉडीबिल्डींगमध्ये नाव कमावले होते. त्यानंतर ते राज्यपालपदी नियुक्त झाले. राजकारणात येण्याआधी त्यांची ओळख 'ऑस्ट्रीयन ओक' अशी होती.
-
आफ्रिकेचे प्रसिद्ध फुटबॉलपटू जॉर्ज वेह यांनी फिफा विश्वचषक स्पर्धेत प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार पटकावला आहे. आपल्या १८ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर वेह यांनी काँग्रेस फॉर डेमोक्रेटीक चेंज हा पक्ष स्थापन करत दुसऱ्या प्रयत्नात लिबेरीयाचे पंतप्रधानपद भूषवले.
-
अमेरिकेत फुटबॉल खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले जॅक केम्प यांनी १९७० मध्ये खेळातून निवृत्ती घेतली. त्यानंतर रिपब्लिकन प्रायमरीजचे अध्यक्षपदाचे उमेदवार होते.
-
रशियाचा गॅरी कॅस्परोव्ह या बुद्धिबळपटूची खेळातील कारकीर्द अतिशय उत्तम होती. खेळातील निवृत्तीनंतर ते रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रमुख दावेदार होते.
बॉक्सिंगमध्ये प्रसिद्ध खेळाडू म्हणून ओळख असलेले मॅनी पॅक्युओ हे फिलिपिन्सचे संसदेतील प्रतिनिधी होते. हे पद त्यांनी दोन वेळा भूषविले आणि आता ते सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
इम्रानप्रमाणे या खेळाडूंचीही राजकीय इनिंग ठरली यशस्वी
दोन्ही कारकीर्दी गाजवल्या
Web Title: Sportspersons found their second inning in politics like imran khan pakistan