-
‘अवनी’ वाघिणीच्या हत्येनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून वाघिणीच्या हत्येचा निषेध म्हणून रविवारी मुंबईसह पुणे, नागपूर येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईमधील मोर्चेकऱ्यांनी ‘अवनी’च्या नावाने वन्यप्राणी संरक्षण कायदा बनवावा अशीही मागणी बॅनर्सच्या माध्यमातून केली. निर्मल हरिंद्रन यांच्या नजरेतून टिपलेली याच मोर्चातील काही क्षणचित्रे
-
‘अवनी’ला न्याय मिळावा आणि तिच्या बछडय़ांच्या शोधमोहिमेला गती यावी यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात प्राणीमित्रांसह विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
-
प्राणीप्रेमींनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदवला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, दोषींना कठोर शासन व्हावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
-
मुंबईत वरळी सागरी सेतू ते शिवाजी पार्क दरम्यान मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली.
-
पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शिवाजी पार्क येथेच याचे आयोजन करण्यात आले.
-
प्राणीप्रेमींसह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेस नेत्या प्रिया दत्त, ‘मनसे’च्या वाहतूक सेनेचे नितीन नांदगावकर, अभिनेत्री रुपाली गांगुली उपस्थित होते.
-
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी केली.
‘अवनी’च्या नावाने कायदा बनवा, मुंबईत प्राणीप्रेमींचा मोर्चा
प्राणीप्रेमींनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदवला.
Web Title: Protest against murder for tigress avni at mumbai