-
भारतामध्ये समलैंगिक संबंधांना हळूहळू समाज मान्यता मिळत आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. २०१८ मध्ये ६ सप्टेंबर रोजी भारतामध्ये समलिंगी संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कायदेशीर मान्यता मिळाली. परस्पर संमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, "समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही," असं स्पष्ट केलं. या निर्णयाचे देशभरातून स्वागत झाले. भारतामधील समलैंगिक हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र असं असलं तरी आजही काहीजण समलैंगिकतेला स्वीकारण्यास तयार नाहीत. अशा लोकांचा समलैंगिकतेबद्दल दृष्टीकोन बदलावा याच हेतूने केरळमधील एका समलैंगिक जोडप्याने खास प्री वेडिंग शूट केले आहे. सध्या या प्री-वेडिंग शूटमधील अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. (सर्व फोटो: अनुश्री प्रकाश/फेसबुक)
-
लोकांचा समलैंगिकतेबद्दल दृष्टीकोन बदलावा याच हेतूने केरळमधील या समलैंगिक जोडप्याने खास प्री वेडिंग शूट केले आहे.
-
केरळमधील नावेद अँथनी चुल्लीकल आणि अब्दुल रहीम या दोघांनी नुकतेच आपले प्री वेडिंग शूट केले आहे.
-
नावेद आणि अब्दुल या दोघांनीही आपले फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहेत.
-
"होय हे शक्य आहे. हे अगदीच नॉर्मल आहे," अशी कॅप्शन या दोघांनी हे फोटो शेअर करताना दिली आहे.
-
नावेद आणि अब्दुल या दोघांनी दोन टप्प्यांमध्ये आपले प्री वेडिंग शूट केले आहे.
-
एक प्री वेडिंग शूट त्यांनी त्यांच्या लाडक्या पाळीव प्राण्यांबरोबर म्हणजेच गिनी पिग आणि कुत्र्याबरोबर केलं आहे.
-
नावेद आणि अब्दुल यांनी आपले दुसरे प्री वेडिंग शूट दुसरे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. त्यांच्या या फोटोशूटला अनेकांनी लाईक केलं आहे.
-
समलैंगिक पुरुषांचे प्री वेडिंग शूटमधील फोटोही सुंदर आणि रोमॅन्टीक असू शकतात हे आम्हाला लोकांना दाखवायचं होतं – नावेद अँथनी चुल्लीकल
-
"समलैंगिक पुरुषांचे प्री वेडिंग शूटमधील फोटोही सुंदर आणि रोमॅन्टीक असू शकतात हे आम्हाला लोकांना दाखवायचं होतं. या फोटो शूटमध्ये अश्लील असं काहीच नाही," असंही नावेदने स्पष्ट केलं आहे.
-
लवकरच अडकणार लग्नबंधनात
-
"हे फोटो व्हायरल होतील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही हे शूट केलेलं नाही. उलट भारतीय समाजामध्ये अशी लग्न शक्य आहेत आणि ही अगदीच सामान्य गोष्ट आहे असा संदेश देण्याच्या उद्देशाने आम्ही हे शूट केलं होतं," असं २७ वर्षीय नावेद सांगतो.
-
"एखादे जोडपे आपल्या लग्नामध्ये ज्याप्रमाणे सर्व गोष्ट करतात तसंच आम्ही केलं आहे," असं नावेद म्हणाला.
-
२०१८ मध्ये ६ सप्टेंबर रोजी भारतामध्ये समलिंगी संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कायदेशीर मान्यता मिळाली आहे.
-
दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही – सर्वोच्च न्यायालय
-
समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगीबाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही – सर्वोच्च न्यायालय
-
आम्ही लग्नाआधी होणारा हळदी समारंभ, संगीत, मेहंदी असे सर्वच कार्यक्रम केले आहेत," असंही नावेद म्हणाला.
-
या फोटो शूटमध्ये अश्लील असं काहीच नाही – नावेद अँथनी चुल्लीकल
-
"होय हे शक्य आहे. हे अगदीच नॉर्मल आहे," अशा कॅप्शनने हे फोटो शेअर केले आहेत.
-
लवकरच नावेद आणि अब्दुल या दोघांचे लग्न होणार आहे.
-
तारीख नक्की नसली तरी दोघांनाही डिसेंबर महिना संपण्याआधीच लग्न करायचे असल्याची माहिती नावेदने दिली.
समलैंगिक जोडप्याचे प्री वेडिंग फोटोशूट
“समलैंगिक पुरुषांचे प्री वेडींग शूटमधील फोटोही सुंदर आणि रोमॅन्टीक असू शकतात”
Web Title: After pre wedding shoot goes viral kerala gay couple say they wanted to show it was normal scsg