-
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी चिघळले. विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारातील आंदोलनाची धग देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. मुंबईत निदर्शकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या निदर्शकांनी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. निदर्शकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘मोदी शहासे आझादी’, ‘तानाशाही नही चलेगी’, ‘हिंदू, मुस्लिम एक है, मोदी-शहा फेक है’, ‘स्टॉप डिव्हायडिंग इंडिया’, आदी घोषणाबाजी निदर्शक करत होते. अनेक मोठ्या शहरांमध्ये निघालेल्या मोर्चांमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे या मोर्चांमध्ये एक सो एक भन्नाट पोस्टर्स पहायला मिळाले. या पोस्टर्समधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना टोला लगावण्याबरोबरच तरुणाई आपल्या हटके स्टाइलने म्हणणे मांडले. पाहुयात असेच काही भन्नाट पोस्टर्स….
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
मोदी-शाह यांच्यावर तरुणाईची टोलेबाजी; पाहा आंदोलनातील चर्चेतील पोस्टर्स
तरुणाई आपल्या हटके स्टाइलने आंदोलन करत अनेकप्रकारचे पोस्टर्स या आंदोलनामध्ये झळकावले
Web Title: Youth slams modi and amit shah the best posters from protests all over india against caa nrc scsg