Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. these six ministers of uddhav thackeray cabinet is all about dynasty politics in maharashtra scsg

ठाकरे सरकारमध्येही घराणेशाही: अर्धा डझन नवनिर्वाचित मंत्री आहेत राजकीय वारसदार

केवळ आदित्य ठाकरे नाही तर या पाच राजकीय वारसदारांना मिळालंय मंत्रीपद

December 30, 2019 13:21 IST
Follow Us
  • विधानसभा निवडणुकीमध्ये वरळीमधून पहिल्यांदाच आमदार झालेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असणाऱ्या आदित्य यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील सदस्यानं प्रथमच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले आहे. आमदार झाल्यानंतर थेट मंत्रिमंडळात आणि थेट कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळण्याची ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. मात्र अशाप्रकारे नेतेपदी वर्णी लागलेले आदित्य हे एकमेव नेते नसून एकूण सहाजण हे राजकीय कुटुंबातील वारस असल्याचे दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सहाजण जे राजकारणातील घराणेशाहीचा वारसा पुढे नेणार आहेत.
    1/8

    विधानसभा निवडणुकीमध्ये वरळीमधून पहिल्यांदाच आमदार झालेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असणाऱ्या आदित्य यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील सदस्यानं प्रथमच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले आहे. आमदार झाल्यानंतर थेट मंत्रिमंडळात आणि थेट कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळण्याची ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. मात्र अशाप्रकारे नेतेपदी वर्णी लागलेले आदित्य हे एकमेव नेते नसून एकूण सहाजण हे राजकीय कुटुंबातील वारस असल्याचे दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सहाजण जे राजकारणातील घराणेशाहीचा वारसा पुढे नेणार आहेत.

  • 2/8

    आदित्य ठाकरे – या यादीमधील पहिले नाव आहे आदित्य ठाकरे यांचेच. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांनी वरळीमधून मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता. वरळी विधानसभा मतदारसंघतून आदित्य यांना ८९,२४८ मते मिळाली. तर त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांना २१,८२१ आणि बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांना ७८१ मतं मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाचे बॅनर्स झळकले होते.

  • 3/8

    अमित देशमुख – आदित्य ठाकरेंप्रमाणेच अमित देशमुख हे ही ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र असणारे अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघामधून निवडणूक जिंकली. त्यांनी भाजपाच्या शैलेश लाहोटी यांचा पराभव केला होता. अमित यांच्याबरोबरच त्यांचे थोरले बंधू धीरज देशमुख यांनाही लातूर शहर मतदारसंघामधून निवडणूक जिंकली. त्यांनी तब्बल १ लाख १९ हजार मतांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला. विलासरावांइतकी त्यांच्या मुलाची नाळ जनतेशी नाही ही चर्चाही जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर विलासराव यांच्या पुत्रांनी मिळवलेला हा विजय अनेक अर्थांनी महत्वाचा ठरला.

  • 4/8

    वर्षा गायकवाड – धारावी मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या वर्षा गायकवाडही मंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ११ हजार ८२४ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ५३ हजार ९१५ मते मिळाली. या विजयासह त्यांनी आमदारकीची हॅट्रिक साजरी केली. वर्षा यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये महिला व बालकल्याण विकासमंत्रीपद भूषवले होते. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत.

  • 5/8

    विश्वजीत कदम – काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदमही मंत्रीपदाची शपथ घेतली. सांगलीतील पलूस-कडेगाव मतदारसंघातून कदम १ लाख ६२ हजार ५२१ इतके मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेसने सध्या कदम यांच्याकडे दिली आहे. विश्वजीत हे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत.

  • 6/8

    आदिती तटकरे – राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरेही मंत्रीपदाची शपथ घेतली. श्रीवर्धन मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या आदिती या ३८ हजार ७८३ मतांनी विजयी झाल्या. आदिती तटकरे यांना एकूण ९२ हजार ०७४ मते पडली होती.

  • 7/8

    शंकरराव गडाख – अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली. निवडून आल्यानंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. शंकरराव हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत. शंकरराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा जाहीर केला होता. मात्र निवडणुकीनंतर शंकरराव यांनी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

  • 8/8

    प्राजक्त तनपुरे – राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राहुरी मतदारसंघामधून प्राजक्त आमदार म्हणून निवडून आले आहेत. तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे पंचवीस वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे प्राजक्त यांचे मामा आहेत.

Web Title: These six ministers of uddhav thackeray cabinet is all about dynasty politics in maharashtra scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.