• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra mla who take the name of their mother while taking minister oath scsg

मातृ देवो भव! ‘या’ १२ मंत्र्यांनी शपथ घेताना केला आईच्या नावाचा उल्लेख

१२ मंत्र्यांनी शपथ घेताना आईचेही नाव घेत ‘मातृ देवो भव’ची प्रचीती दिली

December 31, 2019 10:48 IST
Follow Us
  • ‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेताना वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नावही आवर्जून घेण्याचा नवा पायंडा पाहायला मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या १२ मंत्र्यांनी शपथ घेताना आईचेही नाव घेत ‘मातृ देवो भव’ची प्रचीती दिली. जाणून घेऊयात कोण कोणत्या नेत्यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.
    1/15

    ‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेताना वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नावही आवर्जून घेण्याचा नवा पायंडा पाहायला मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या १२ मंत्र्यांनी शपथ घेताना आईचेही नाव घेत ‘मातृ देवो भव’ची प्रचीती दिली. जाणून घेऊयात कोण कोणत्या नेत्यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.

  • 2/15

    महाविकास आघाडी सरकारच्या सोमवारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शपथविधीतही तोच पायंडा पाहायला मिळाला. अनेक मंत्र्यांनी शपथ घेताना वडिलांबरोबरच आईचेही नाव घेत मातृदेवो भव.. ही उक्ती कृतीत आणली आणि आईविषयीचे ऋण व्यक्त केले. यात तिन्ही पक्षांच्या आमदारांचा समावेश होता.

  • 3/15

    मंत्रिपदाची शपथ घेताना आपले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे पूर्ण नाव घेऊन पुढील शपथ घेण्याची सर्वसाधारण रीत आहे. आतापर्यंतच्या मंत्रिमंडळ शपथविधीत त्याच पद्धतीने मंत्री शपथ घेत. यंदा विधानसभा निवडणुकीनंतर विधिमंडळ अधिवेशनात आमदारकीची शपथ घेताना अनेक आमदारांनी वडिलांबरोबरच आईचे नाव घेतले.

  • 4/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनीही शपथ घेताना आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केला. आदिती यांच्या आईचे नाव वरदा आहे.

  • 5/15

    शिवसेनेच्या शंभुराज देसाई यांनी शपथ घेताना आईचे नाव घेतले.

  • 6/15

    राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी आई लिलावती यांच्या नावाचा उल्लेख केला.

  • 7/15

    ‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशी शपथ आदित्य ठाकरे यांनी घेतली.

  • 8/15

    शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शपथ घेताना आईचे नाव घेतले.

  • 9/15

    काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले. त्यांच्या आईचे नाव ललिता गायकवाड आहे.

  • 10/15

    विश्वजित कदम यांनी आपल्या मातोश्री विजयमाला यांच्या नावाचा शपथ घेताना उल्लेख केला.

  • 11/15

    काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आई शांतादेवी यांचे नाव शपथ घेताना घेतले.

  • 12/15

    काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनीही शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.

  • 13/15

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब पाटील यांनीही शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले.

  • 14/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली आई सकिनाबेन मुश्रीफ यांचे नाव शपथ घेताना घेतले.

  • 15/15

    प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शपथ घेताना आपल्या आईचे नाव घेतले. बच्चू कडू यांच्या आई इंदिराबाई या शपथविधीसाठी उपस्थित होत्या.

Web Title: Maharashtra mla who take the name of their mother while taking minister oath scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.