• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. four indian cities in the world worst traffic choked list scsg

ही आहेत जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असणारी शहरे; भारतातील चार शहरांचा समावेश

ही आहेत सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारी जगातील TOP 10 शहरे

January 30, 2020 15:15 IST
Follow Us
  • जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या दहा शहरांच्या यादीमध्ये चार भारतीय शहरांचा समावेश असल्याचा अहवाल नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहरही भारतामधीलच आहे.
    1/15

    जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या दहा शहरांच्या यादीमध्ये चार भारतीय शहरांचा समावेश असल्याचा अहवाल नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहरही भारतामधीलच आहे.

  • 2/15

    टॉमटॉमस ट्रॅफिक इंडेक्स या डच कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार भारतामधील बंगळुरू हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर ठरले आहे.

  • 3/15

    अहवाल कसा तयार केला? डिजीटल नकाशे आणि नॅव्हिगेशन श्रेत्रात काम करणाऱ्या टॉमटॉमस ट्रॅफिक इंडेक्स कंपनीने २०१९ सालातील वाहतूक कोंडीसंदर्भातील अहवाल तयार केला आहे. एखाद्या शहरामध्ये भटकंती करताना कितीवेळा वाहतूक कोंडीला समोरे जावे लागते या आधारावर शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये रस्त्यांची रुंदी, वाहतूक व्यवस्थेसाठी उपलब्ध असणाऱ्या मुलभूत सुविधा, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागतो, शहरातून प्रवास करताना किती वेळा एका जागी थांबून वाट पाहावी लागते अशा अनेक गोष्टींचा अभ्यास कंपनीने केला आहे.

  • 4/15

    टॉमटॉमस ट्रॅफिक इंडेक्सचे निक कोहेन यांनी, "एका अर्थाने वाहतूक कोंडी होणे हे आर्थिक विकासाचे आणि सधनतेचे निर्देशक असले तरी यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो", असं मत व्यक्त केलं आहे. अनेक भारतीय शहरांमध्ये वाहनांची संख्या आणि रस्त्यांचा आकार याचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. वाहतूक कोंडीमुळे भारतामधील वायू प्रदुषणाचा प्रश्न गंभीर रुप धारण करत असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

  • 5/15

    या दहा शहरांच्या यादीमध्ये तळाशी इंडोनेशियामधील जकार्ता हे शहर आहे. जकार्तामध्ये ५३ टक्के वाहतूक कोंडी असल्याचे हा अहवाल सांगतो.

  • 6/15

    तुर्कीमधील इस्तांबूल शहर या यादीत नवव्या स्थानी आहे. येथे ५५ टक्के वाहतूक कोंडी असते. वर्षभरापूर्वी हाच आकडा ५३ टक्के इतका होता.

  • 7/15

    आठव्या स्थानी पुन्हा एक भारतीय शहर आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये ५६ टक्के वाहतूक कोंडी आहे. समाधानाची बाब म्हणजे दिल्लीतील वाहतूक कोंडी दोन टक्क्यांनी कमी झाली आहे.

  • 8/15

    पेरु देशातील लिमा शहर या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहे. लिमामध्ये ५७ टक्के वाहतूक कोंडी असते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. मागील वर्षी याच अहवालात लिमामधील वाहतूक कोंडी ५८ टक्के असल्याचे नमूद करण्यात आलं होतं.

  • 9/15

    रशियामधील मॉस्को हे जगातील सहावे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर आहे. या शहरामध्ये ५९ टक्के वाहतूक कोंडी असते. वर्षभरापूर्वी हाच आकडा ५६ टक्के इतका होता.

  • 10/15

    पाचव्या क्रमांकावर आहे पुणे शहर. पुण्यामध्येही ५९ टक्के वाहतूक कोंडी असते असं हा अहवाल सांगतो. मुंबईच्या तुलनेत ही वाहतूक कोंडी कमी असली तरी जागतिक स्तरावर वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा पाचवा क्रमांक लागतो.

  • 11/15

    चौथ्या क्रमांकावरही भारतीय शहर आहे. चौथ्या क्रमांकावर भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईमध्ये ६५ टक्के वाहतूक कोंडी असल्याचे हा अहवाल सांगतो. मात्र त्यातही समाधानाची बाब म्हणजे मागील वर्षीच्या (२०१८) तुलनेत या वाहतूक कोंडीमध्ये वाढ झालेली नाही.

  • 12/15

    बोगोटा या कोलंबियामधील शहरामध्येही मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी असते. हे शहर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी असून येथे ६८ टक्के वाहतूक कोंडी असते. या शहरामधील वाहतूक कोंडीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढले आहे.

  • 13/15

    फिलिपिन्समधील मानिला शहर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शहरामध्येही ७१ टक्के वेळा वाहतूक कोंडी असते.

  • 14/15

    सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगभरातील शहरांमध्ये पहिला क्रमांक आहे बंगळुरू शहराचा. बंगळुरूमध्ये ७१ टक्के वेळा वाहतूक कोंडी असते.

  • 15/15

    विशेष म्हणजे ही यादी पाहिल्यावर यामध्ये आशिया खंडातील शहरांचा भरणा असल्याचे दिसून येते.

Web Title: Four indian cities in the world worst traffic choked list scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.