Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos everything you want to know about avyaan tomar chhota kejriwal a selfie king scsg

‘छोटा केजरीवाल’ म्हणून दिल्लीकरांच्या मनावर राज्य करणारा हा छोटू आहे तरी कोण?

चर्चा केवळ आणि केवळ केजरीवाल यांची खऱ्या आणि या छोट्या मुलाचीही

February 13, 2020 14:22 IST
Follow Us
  • दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६३ जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा दिल्लीत विजयी पताका फडकवली. मात्र निकालांच्या दिवशी दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याबरोबर आणखीन एका व्यक्तीची चर्चा होती. ती व्यक्ती म्हणजे 'छोटा केजरीवाल.'
    1/19

    दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६३ जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा दिल्लीत विजयी पताका फडकवली. मात्र निकालांच्या दिवशी दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याबरोबर आणखीन एका व्यक्तीची चर्चा होती. ती व्यक्ती म्हणजे 'छोटा केजरीवाल.'

  • 2/19

    दिल्लीच्या विधानसभा निकालांच्या दिवशी सोशल नेटवर्किंगवर एका लहान मुलाचा फोटो व्हायरल झाला होता.

  • 3/19

    व्हायरल झालेल्या फोटोमधील मुलाच्या डोक्यावर आपचा प्रचार करणारी गांधी टोपी, तपकिरी रंगाचे स्वेटर, गळ्याभोवती काळ्या रंगाचे मफलर डोळ्यावर जाड फ्रेमचा चष्मा आणि ओढांवर मिशी काढलेली होती.

  • 4/19

    दिल्लीतील दिनदयाळ उपाध्याय मार्गावरील आपच्या मुख्यालयामध्येही या छोट्या केजरीवालबरोबर फोटो काढण्यासाठी आप समर्थकांची चढाओढ सुरु होती.

  • 5/19

    आपच्या मुख्यालयाबरोबरच सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरलेल्या या 'छोट्या केजरीवाल'चे खरं नाव आहे आयन तोमर. आपच्या समर्थकांनी त्याला 'छोटा केजरीवाल' हे टोपणनाव दिलं आहे.

  • 6/19

    अवयान अवघ्या एका वर्षाचा आहे.

  • 7/19

    केजरीवाल यांच्या वेशभूषेत आपच्या मुख्यालयात दाखल झालेल्या आयनभोवती आप समर्थकांनी एकच गर्दी केली.

  • 8/19

    अवयानला केजरीवाल यांच्यासारख्या लूक देण्यामागे त्याची आई मिनाक्षीचा मोठा हात असल्याचं राहुल सांगतात.

  • 9/19

    आपच्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुनही या छोट्या केजरीवालचा फोटो 'मफलरमॅन' या कॅप्शनसहीत पोस्ट करण्यात आला होता.

  • 10/19

    अवयानचे वडील राहुल तोमर आणि आई मिनाक्षी दोघेही आपचे मोठे समर्थक आहेत.

  • 11/19

    "केवळ मी नाही तर माझे संपूर्ण कुटुंबातील सर्वच सदस्य अरविंद केजरीवाल यांचे चाहते आहेत. आम्ही त्यांच्या विचारांनुसार वागण्याचा आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो," असं राहुल सांगतात.

  • 12/19

    २०१५ मध्ये केजरीवाल दुसऱ्यांदा विजयी झाले होते त्यावेळी अवयानच्या मोठ्या बहिणीला केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन आपच्या कार्यालयात गेली होती असं राहुल सांगतात. त्यावेळी ती केवळ पाच वर्षांची होती.

  • 13/19

    "आता आमची मुले लहान आहेत पण त्यांच्या डोक्यात राजकारणाबद्दल एक प्रतिमा तयार होत आहे. मागच्या वेळी माझी मुलगी केजरीवाल यांच्यासारखा पोषाख करुन गेली होती तेव्हा त्यांनी तिचे कौतुक केलं होतं," असंही राहुल सांगतात.

  • 14/19

    केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य श्रेत्रात केलेल काम कौतुकास्पद असल्याचंही राहुल सांगतात.

  • 15/19

    अवयानचे संपूर्ण कुटुंबच केजरीवाल यांचे समर्थक आहे.

  • 16/19

    अवयानबरोबर सेल्फी काढण्यासाठी आपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

  • 17/19

    अनेक वृत्तपत्रांमध्येही अवयानचे फोटो छापून आले.

  • 18/19

    एकीकडे अनेकजण अवयानबरोबर फोटो काढून घेण्यात व्यस्त असतानाच दुसरीकडे अवयान मात्र फुग्यांशी खेळत होता. त्याच्या व्हायरल झालेला वर बघतानाचा फोटोही तो हवेत उडणारे फुगे बघत असताना काढलेला आहे.

  • 19/19

    अवयानला केजरीवाल यांनी शपथविधीसाठी खास आमंत्रण दिलं आहे.

Web Title: Photos everything you want to know about avyaan tomar chhota kejriwal a selfie king scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.