Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nirbhaya case live updates process of hanging a criminal scsg

फाशी देताना तुुरुंगात नक्की काय काय घडतं? जाणून घ्या १५ गोष्टी

फाशी नक्की कशी दिली जाते याबद्दल जल्लादानेच दिलेली माहिती

March 20, 2020 04:41 IST
Follow Us
  • निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फासावर लटवले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावं आहेत. पवन गुप्ता आणि अक्षय सिंग या दोघांनी केलेल्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत. या चारही आरोपींना फासावर लटकवण्यासाठी पवन जल्लाद मेरठवरुन दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये काही दिवसांपूर्वीच पोहचला आहे.
    1/15

    निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींनी २० मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फासावर लटवले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. मुकेश सिंग (वय-३२), पवन गुप्ता (वय-२५), विनय शर्मा (वय-२६) आणि अक्षय कुमार सिंग (वय-३१) अशी आरोपींची नावं आहेत. पवन गुप्ता आणि अक्षय सिंग या दोघांनी केलेल्या याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत. या चारही आरोपींना फासावर लटकवण्यासाठी पवन जल्लाद मेरठवरुन दिल्लीतील तिहार तुरुंगामध्ये काही दिवसांपूर्वीच पोहचला आहे.

  • 2/15

    या प्रकरणामधील आरोपींनी दुसऱ्यांदा केलेली दयेची याचिका राष्ट्रपतींनी स्वीकारली नाही. तसेच शेवटपर्यंत फाशी वाचवण्यासाठी आरोपींची धडपड सुरु होती. त्यामुळे फाशीला अवघे काही तास उरलेले असताना आरोपींच्या वकिलांनी कोर्टात फाशी टाळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र या याचिकेत कोणतेही ठोस मुद्दे नाहीत हे स्पष्ट करत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. ज्यामुळे निर्भयाच्या दोषींना फाशी होणार हे आता निश्चित झालं आहे.

  • 3/15

    पवन जल्लादने काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फाशी देण्याआधी नक्की काय काय घडतं याची माहिती दिली होती. फाशी देण्याआधी जेथे फाशी देण्यात येते तेथे काय वातावरण असतं याची माहिती पवनने दिली होती.

  • 4/15

    डेथ वॉरंटवर असणाऱ्या फाशीच्या तारखेनुसार जल्लादाला तुरुंगामध्ये बोलवले जाते. तुरुंग प्रशासन यासंदर्भातील निर्णय घेतं. जल्लाद तुरुंग प्रशासनाच्या मदतीने फाशी कशी द्यायची याबद्दल योग्य ती आखणी करतो. यामध्ये आरोपींचे पाय कसे बांधायचे यापासून ते कोणती रस्सी वापरली जावी याबद्दलचे निर्णय घेतले जातात.

  • 5/15

    फासावर चढवण्यात येते त्या दिवसाबद्दल माहिती देताना पवनने, “फाशीचा जो वेळ निश्चित केलेला असतो त्याच्या १५ मिनिटं आधी आरोपीला तुरुंगामधून बाहेर काढलं जातं. तोपर्यंत आमची तयारी पूर्ण झालेली असते. फाशीची तयारी करण्यासाठी एक ते दीड तासांचा वेळ लागतो,” अशी माहिती दिली.

  • 6/15

    कोठडीमधून आरोपींना फाशीच्या ठिकाणी आणताना त्यांच्या हातात बेड्या घातल्या जातात किंवा त्यांचे हात मागे करुन रस्सीने बांधले जातात. प्रत्येक आरोपीच्या आजूबाजूला दोन शिपाई असतात. सामान्यपणे १५ मिनिटं आधी आरोपींना कोठडीतून बाहेर काढलं जातं. मात्र फाशी देण्याचे ठिकाणी आणि कोठडी यामधील अंतर जास्त असल्यास आरोपींना लवकर बाहेर काढण्याचा निर्णय तुरुंग प्रशासन घेतं, असं पवन सांगतो.

  • 7/15

    प्रत्यक्ष फाशी देताना चार ते पाच पोलीस शिपाई उपस्थित असतात असं पवन सांगतो. हे शिपाई आरोपींना फासाच्या तख्तावर चढवण्यासाठी उपस्थित असतात. जेथे फाशी दिली जाणार आहे त्या कठड्यावर आरोपींना योग्य ठिकाणी उभं करण्याची जबाबदारी या शिपायांवर असते. फाशी देण्याच्या ठिकाणी कोणी काहीही बोलत नाही. केवळ हाताच्या आणि नजरेच्या इशाऱ्यावर सारं काम चालतं असं पवनने सांगितलं.

  • 8/15

    फाशीच्या एक दिवस आधी जल्लाद, तुरुंगाचे अधीक्षक आणि फाशी देताना उपस्थित राहणाऱ्या पोलीस शिपायांची एक बैठक होते. फाशीच्या वेळी अधीक्षक आणि डेप्युटी जेलर तसेच डॉक्टरही उपस्थित असतात.

  • 9/15

    फाशीच्या एक दिवस आधी जल्लाद, तुरुंगाचे अधीक्षक आणि फाशी देताना उपस्थित राहणाऱ्या पोलीस शिपायांची एक बैठक होते. फाशीच्या वेळी अधीक्षक आणि डेप्युटी जेलर तसेच डॉक्टरही उपस्थित असतात.

  • 10/15

  • 11/15

    डोक्यावर काळी टोपी घालणे आणि फास आवळण्याचे काम करताना आरोपीच्या समोर उभं राहत नाहीत. आरोपीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहून हे केलं जातं. आरोपी लाथ मारुन फाशी देणाऱ्या व्यक्तीला विरोध करण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेतली जाते.

  • 12/15

    फास व्यवस्थित बसला आहे का नाही हे पाहण्यासाठी आरोपीच्या गळ्यात फास आवळल्यानंतर त्याच्या भोवती गोल प्रदक्षिणा घालून यासंदर्भातील खात्री केली जाते. त्यानंतर जल्लाद फाशी देण्यासाठी असलेल्या खटक्याजवळ (लीवर) जाऊन उभे राहतात. तुरुंग अधीक्षकांना अंगठा दाखवून आमचं काम पूर्ण झालं आहे असं सूचित केलं जातं. अधीक्षकांनी इशारा देताच जल्लाद खटका खेचतो. आरोपीला फासावर लटकवण्यासाठी उभं केलं जातं तेव्हा फासाच्या खाली जमीनीवर एक वर्तुळ आखलं जातं. त्या वर्तुळातच आरोपीला उभं केलं जातं.

  • 13/15

    तरुंगाचे अधीक्षक रुमाल टाकून इशारा देतात आणि जल्लाद खटका खेचतो. खटका खेचताच आरोपीच्या पायाखालील लाकडी दारे उघडली जातात आणि आरोपी फासावर लटकतो. १० ते १५ मिनिटं आरोपीला फासावर लटकून ठेवले जाते.

  • 14/15

    १० ते १५ मिनिटांनंतर डॉक्टर आरोपीच्या मृतदेहाजवळ जाऊन त्याची तपासणी करतात. हृद्याची धडधड थांबली आहे का हे तपासून पाहतात. डॉक्टर तपासणी करेपर्यंत मृतदेह थंड झालेला असतो, असं पवन सांगतो.

  • 15/15

TOPICS
निर्भयाNirbhaya

Web Title: Nirbhaya case live updates process of hanging a criminal scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.