• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. coronavirus safe simple lockdown advice from us to you cmo office maharashtra 14 tips scsg

घराबाहेर पडत असाल तर राज्य सरकारने जारी केलेल्या या १४ सूचना लक्षात ठेवा

या महत्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करु नका

March 26, 2020 16:11 IST
Follow Us
  • करोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारांहून अधिक झाला आहे. तर मृतांची संख्या २० हजारहून अधिक झाली आहे.
    1/17

    करोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारांहून अधिक झाला आहे. तर मृतांची संख्या २० हजारहून अधिक झाली आहे.

  • 2/17

    असं असताना भारतामध्येही करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने संपूर्ण देशच २१ दिवस लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असून २५ मार्च ते १४ एप्रिल या काळामध्ये देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होईल अशी भिती अनेकांना असल्याने किराणामालाच्या दुकानामध्ये अनेकजण गर्दी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने लॉकडाउनदरम्यान सर्वसामान्यांनी पाळाव्यात अशा आठ सूचना जारी केल्या आहेत.

  • 3/17

    पहिली सूचना: ग्राहकांनी दुकानाबाहेर योग्य अंतर राखून रांगेत उभे रहावे

  • 4/17

    दुसरी सूचना: आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.

  • 5/17

    तिसरी सूचना: घराबाहेर पडताना मास्क वापरावा

  • 6/17

    चौथी सूचना: खरेदी करताना व पैसे देताना दुकानदारापासून योग्य अंतर राखा.

  • 7/17

    पाचवी सूचना: घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणे टाळा.

  • 8/17

    सहावी सूचना: पोलिसांनी थांबवल्यास तुमचे घराबाहेर पडण्याच कारण स्पष्ट करा.

  • 9/17

    सातवी सूचना: गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानादारांना व्हॉट्सअपवर ऑर्डर घेऊन ग्राहकांना डिलिव्हरीची वेळ घावी.

  • 10/17

    आठवी सूचना: अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर असलेल्यांनी आपले ओळखपत्र सतत जवळ ठेवावे.

  • 11/17

    नववी सूचना: ड्रायव्हर, नोकर इत्यादी व्यक्तीना पगारी रजा द्या. कामावर येताना त्यांना संसर्ग झाला तर तो तुम्हालाही होऊ शकतो.

  • 12/17

    दहावी सूचना: डिलिव्हरीसाठी येणाऱ्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखा.

  • 13/17

    अकरावी सूचना: घरी आल्यावर प्रथम आपले हात साबण आणि पाण्याने धुवा.

  • 14/17

    बारावी सूचना: खरेदीसाठी एक वेगळी पिशवी राखून ठेवा.

  • 15/17

    तेरावी सूचना: संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक टाळा.

  • 16/17

    चौदावी सूचना: संसर्गाची चिन्हे दिसल्यास प्रथम स्वत:ला सर्वांपासून वेगळे करा आणि हेल्पलाइनवर फोन करा.

  • 17/17

    वेगवेगळ्या राज्यांचे हेल्पलाइन क्रमांक

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus safe simple lockdown advice from us to you cmo office maharashtra 14 tips scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.