Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. coronavirus kerala gireesh a coconut tree climber provides food and water to police personnel in lockdown scsg

कौतुकास्पद… झाडावर चढून नारळ काढणार व्यक्ती पोलिसांना करतोय मदत

पोलिसांनाही या व्यक्तीच्या कामाचे कौतुक केलं आहे

April 21, 2020 16:39 IST
Follow Us
  • करोनामुळे संपूर्ण जग जणू काही थांबले आहे. अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्येही करोनाशी संघर्ष करणारे पहिल्या फळीमधील योद्धे दिवस रात्र काम करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सामान्यांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाही काहीजण आधार देताना दिसत आहेत. अशाच काही सामान्य असणाऱ्या मात्र असामन्य काम करणाऱ्या लोकांचे दर्शन या कठीण प्रसंगात होताना दिसत आहे. केरळमध्येही झाडावर चढून नारळ काढण्याचे काम करणारा एक व्यक्ती चक्क ऑन ड्युटी पोलिसांनी मदत करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. (प्रातिनिधिक फोटो)
    1/12

    करोनामुळे संपूर्ण जग जणू काही थांबले आहे. अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्येही करोनाशी संघर्ष करणारे पहिल्या फळीमधील योद्धे दिवस रात्र काम करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सामान्यांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाही काहीजण आधार देताना दिसत आहेत. अशाच काही सामान्य असणाऱ्या मात्र असामन्य काम करणाऱ्या लोकांचे दर्शन या कठीण प्रसंगात होताना दिसत आहे. केरळमध्येही झाडावर चढून नारळ काढण्याचे काम करणारा एक व्यक्ती चक्क ऑन ड्युटी पोलिसांनी मदत करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. (प्रातिनिधिक फोटो)

  • 2/12

    गिरेश असं या झाडावरुन नारळ काढण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. एनएनआयने दिलेल्या माहितीनुसार गिरेश कलावूर येथे राहतात. ते स्वत:च्या कमाईमधून पोलिसांसाठी पाणी आणि खाण्याच्या वस्तू वाटतो विकत घेऊन ती वाटतात. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 3/12

    “मी माझ्या दिवसभराच्या कमाईमधून काही हिस्सा बाजूला काढतो आणि त्यामधून पोलिसांना मदत करतो. मी जास्त कमवत नाही. मी त्यांना फक्त केळी आणि सोड्याच्या बाटल्या देतो,” असं गिरेश सांगतात. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 4/12

    कलावूरचे पोलीस सहाय्यक निरिक्षक असणाऱ्या टालसन जोसेफ यांनाही गिरेश यांच्या कामाचे कौतुक केलं आहे. “मी रोज या व्यक्तीला मोटरसायकलवर बघतो. मी जेव्हा या व्यक्तीबद्दल चौकशी केली तेव्हा तो पोलिसांना पाणी आणि स्नॅक्स देतो अशी माहिती मला मिळाली,” असं जोसेफ सांगतात. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 5/12

    गिरेश स्वत:च्या दुचाकीवरुन सामान घेऊन येतात आणि त्याचे वाटप करतात. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 6/12

    गिरेश यांनी यासाठी आपल्या दुचाकीच्या मागे कॅरेट बांधले आहे. एकट्यालाच पोलिसांना वाटप करण्याचे समान वाटता यावे यासाठी त्यांनी ही सोय केली आहे. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 7/12

    जागोजागी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना गिरेश या सामानाचे वाटप करतात. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 8/12

    एएनआयच्या वृत्तानुसार गिरेश हा झाडावरुन नारळ तोड्याचे काम करतात. आता या कामामधून किती कमाई होत असेल याचा तुम्हीच विचार करा. मात्र असं असतानाही गिरेश पोलिसांना मदत करतात. (फोटो सौजन्य: एएनआय)

  • 9/12

    एएनआयने गिरेश यांचे जे फोटो पोस्ट केले आहेत त्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांनी गिरेश यांच्या कामाचे कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य: ट्विटर स्क्रीनशॉर्ट)

  • 10/12

    अडीच हजारहून अधिक लोकांनी हे ट्विट लाइक केलं आहे. (फोटो सौजन्य: ट्विटर स्क्रीनशॉर्ट)

  • 11/12

    काही दिवसापूर्वीच आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये काम करणाऱ्या महिलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये महिन्याला साडेतीन हजार रुपये कमावणारी लोकामणी नावाच्या महिलेने पदरचे पैसे टाकून ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांसाठी थंड पेयाच्या दोन मोठ्या बाटल्या आणून देताना दिसली होती. या महिलेवर देशभरातून कौतुकाचा वर्षावर झाला होता. “माझी कमाई साडेतीन हजार रुपयेच आहे. मात्र आम्हाला या संकटातून वाचवणाऱ्यांची काळजी घ्यावी असं मला वाटतं,” असं ती या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत होती. आंध्र प्रदेशचे पोलीस महासंचालक (डीजी) गौतम सवांग यांनी या महिलेशी संवाद साधताना, “तुम्ही ज्याप्रकारे कोल्ड ड्रींकच्या दोन मोठ्या बाटल्या आणून दिल्या ते पाहून आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही आईप्रमाणे आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल धन्यवाद. मला जेव्हा या प्रकाराबद्दल समजलं तेव्हा मी तुमचा शोध घेण्यास सांगितला. मला तुमच्याशी प्रत्यक्षात बोलून तुमचे आभार मानायचे होते. तुम्ही ज्याप्रकारे पोलिसांना मदत केली आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला सॅल्यूट करतो,” अशा शब्दांमध्ये आभार मानले होते. (फोटो सौजन्य: ट्विटर स्क्रीनशॉर्ट)

  • 12/12

    तेलंगणामध्येही एका सफाई कर्मचाऱ्याने त्याचा दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पैसे देण्यासंदर्भातील आवाहनाला प्रतिसाद देत या सफाई कामगाराने आपला दोन महिन्याचा पगार म्हणजेच १७ हजार रुपये सहाय्यता निधीला दिल्याचे वृत्त समोर आलं होतं. तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री के.टी रामा राव यांनी ट्विटवरुन या कर्मचाऱ्याचे कौतुक केलं होतं. “माझ्या राज्यातील सामान्य नागरीक हेच खरे हिरो आहेत. आज बोंथा साई कुमार या उत्तनूरमधील सफाई कामगाराने त्याच्या दोन महिन्याचा पगार १७ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले,” असं राव यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. या ट्विटसोबत त्यांनी हा तरुण अधिकाऱ्यांकडे १७ हजारांचा धनादेश देतानाचा फोटोही ट्विट केला होता. (फोटो: के. टी. रामा राव यांच्या ट्विटवरुन)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus kerala gireesh a coconut tree climber provides food and water to police personnel in lockdown scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.