• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai cops seize vehicles of illegal travellers scsg

मुंबई पोलीस ऑन ड्युटी… विनाकारण भटकणाऱ्यांच्या गाड्या केल्या जप्त

मुंबईमध्ये पोलिसांनी सुरु केली वाहन जप्तीची कारवाई

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे आजवर अटोक्यात असलेली ही साथ वाढून आव्हान उभे राहील असे सांगताच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पोलिसांना दिले आहेत. याची अंमलबजावणी तातडीने सुरु झाली असून मंगळवारी सकाळपासूनच पोलीस वाहनांना थांबवून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसले. (सर्व फोटो: निर्मल हरींद्रन)
    1/10

    करोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात नागरिक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे आजवर अटोक्यात असलेली ही साथ वाढून आव्हान उभे राहील असे सांगताच महानगर प्रदेशातील लोकांच्या मुक्त संचाराला वेळीच लगाम घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पोलिसांना दिले आहेत. याची अंमलबजावणी तातडीने सुरु झाली असून मंगळवारी सकाळपासूनच पोलीस वाहनांना थांबवून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करताना दिसले. (सर्व फोटो: निर्मल हरींद्रन)

  • 2/10

    अनेकजण पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांच्याशी रस्त्यावर हुज्जत घालताना दिसून आले. मात्र पोलिसांनाही कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

  • 3/10

    पोलिसांनी अनेकांची दुचाकी वाहने जप्त केली आहेत. अशाप्रकारे सकाळच्या सत्रामध्येच पोलिसांनी हजारो वाहने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 4/10

    अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहने जप्त करुन ती जवळच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जवळच्या जागेत हलवली आहेत.

  • 5/10

    पोलिसांनी हजारोच्या संख्येने दुकाचीस्वारांवर कारवाई केली असून त्यासंदर्भातील रितरस नोंदही करण्यात आली आहे.

  • 6/10

    आमची गाडी जप्त करु नये अशी विनंती अनेकजण पोलिसांकडे करताना दिसत आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेत नसतानाही फिरणाऱ्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

  • 7/10

    प्रत्येक सिग्नलवर अनेक पोलीस उपस्थित असून गाड्यांमधून नागरिक कशासाठी व कुठे चालले आहेत याची चौकशी केली जात आहे.

  • 8/10

    अनेक ठिकाणी पोलिसांनी चारचाकी गाड्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे.

  • 9/10

    अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची माहितीही पोलिसांकडून गोळा केली जात आहे. त्याचीही रितसर नोंद पोलीस ठेवताना दिसत आहेत.

  • 10/10

    जप्त करण्यात आलेल्या गाड्या या आता दंडाची रक्कम भरल्यानंतर काही दिवसांनीच परत केल्या जातील असं सांगण्यात येत आहे.

Web Title: Mumbai cops seize vehicles of illegal travellers scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.