• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. name price side effect and other details about oxford covid 19 vaccine scsg

भारतात लवकरच येणार ऑक्सफर्डची करोना लस; जाणून घ्या नाव, किंमत आणि लसीकरणासंदर्भात

या लसीसंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे पहिल्यांदाच देण्यात आली

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • जगसमोर असलेल्या करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लस बनवण्याचा प्रयत्न जगभरामध्ये सुरु आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्थांकडून सुरु असणारे हे प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहचले आहेत. या सर्वांमध्ये ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात येणारी लस ही सर्वात आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ही लस शेवटच्या टप्प्यामध्येही यशस्वी ठरली तर जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीकडून तीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
    1/15

    जगसमोर असलेल्या करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लस बनवण्याचा प्रयत्न जगभरामध्ये सुरु आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्थांकडून सुरु असणारे हे प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहचले आहेत. या सर्वांमध्ये ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात येणारी लस ही सर्वात आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ही लस शेवटच्या टप्प्यामध्येही यशस्वी ठरली तर जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीकडून तीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

  • 2/15

    भारतीयांसाठी दिलासादायक बातमी ही आहे की या लसीचे उत्पादन घेणारी कंपनी म्हणजेच सिरम इन्स्टिट्युट ही कंपनी भारतीय आहे. ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे निर्देशक अ‍ॅण्ड्रू जे पोलार्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष अदार पूनावाला यांनी या इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या लसीसंदर्भातील अनेक महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. यामध्ये अगदी उत्पादनापासून ते किंमत आणि लसीला काय नाव देणार यासारख्या गोष्टींबद्दलही त्यांनी भाष्य केलं. चला तर मग जाणून घेऊय़ात नक्की काय माहिती दिली आहे त्यांनी…

  • 3/15

    संग्रहित छायाचित्र

  • 4/15

    पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष अदार पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार सिरम इन्स्टिट्युटकडून मोठ्या प्रमाणात या लसीचे उत्पादन घेतलं जाईल. या वर्षी डिसेंबरपर्यंत कोविशील्डचे ३० ते ४० कोटी डोस तयार करण्यात येतील असंही पूनावाला म्हणाले.

  • 5/15

    याच आठवड्यामध्ये कंपनी भारतीय औषध नियामक म्हणजेच डीसीजीआयकडे (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली. कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या ५० टक्के लसी या भारतासाठी ठेवण्यात येणार असून उरलेल्या ५० टक्के लसी जगभरातील देशांमध्ये पाठवण्यात येतील असंही पूनावाला म्हणाले.

  • 6/15

    किंमत किती? ही लस किती रुपयांना उपलब्ध असेल यासंदर्भात पूनावाला यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सध्या संपूर्ण जग करोनाचा सामना करत असल्याने लसीची किंमत कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल असं म्हटलं आहे. या लस विक्रीच्या माध्यमातून नफा कमवण्याचा विचार नसल्याचेही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतामध्ये ही लस एक हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध होईल. 

  • 7/15

    भारत सरकार मोफत लसीकरण करणार का? : भारत सरकारने पोलिओ, मलेरियासारख्या धोकादायक आजारांविरोधात कठोर पावले उचलत देशभरामध्ये लसीकरण मोहीम राबवली होती. याच कारणामुळे भारतामध्ये आता या आजारांनी ग्रासलेले अगदीच मोजके रुग्ण आढळून येतात.

  • 8/15

    करोना हा पोलिओ, मलेरियासारख्या आजारांपेक्षा खूप मोठा आणि जास्त आव्हानात्मक असा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारकडून करोना लसीकरण केलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

  • 9/15

    करोना लसीकरण मोहिमेमध्ये भारतीयांना मोफत किंवा अगदी कमी किंमतीमध्ये करोना लस दिली जाण्याची शक्यता आहे. पूनावाला यांनाही बहुतांश लसी या सरकारकडून खरेदी केल्या जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या लसी लोकांना लसीकरण मोहिमेअंतर्गत मोफत दिल्या जातील असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. 

  • 10/15

    संपूर्ण जगाला करोना लसीची गरज असल्याचे पूनावाला यांनी म्हटलं आहे. सरकार आणि संस्था करोनाची लस बाजारामध्ये लवकरात लवकर उपलब्ध होण्याची वाट बघत आहेत. मात्र सरकारी यंत्रणांचे सहकार्य लाभले तरच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणार असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केलं. निर्मिती आणि वितरण या दोन्ही कामांमध्ये सरकारकडून आम्हाला मदतीची अपेक्षा असल्याचे पूनावाला यांनी म्हटलं आहे.

  • 11/15

    कोविशील्डच्या आतापर्यंतच्या चाचण्यांवरुन ही लस करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये खूपच प्रभावशाली ठरेल असं चित्र दिसत आहे. ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे निर्देशक अ‍ॅण्ड्रू जे पोलार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅण्टीबॉडी रिसपॉन्सवरुन ही लस प्रभावशाली असल्याचे दिसून आलं आहे. (फोटो: oxfordiic dot org वरुन)

  • 12/15

    चाचण्या यशस्वी ठरल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणात ही लस वापरली जाईल तेव्हाच ती किती परिणामकारक आहे हे समजू शकेल असंही पोलार्ड यांनी म्हटलं आहे.

  • 13/15

    चाचण्या यशस्वी ठरल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणात ही लस वापरली जाईल तेव्हाच ती किती परिणामकारक आहे हे समजू शकेल असंही पोलार्ड यांनी म्हटलं आहे.

  • 14/15

    लस लवकर बाजारात आणण्याच्या शर्यतीमध्ये लसीच्या दर्जा खालवणार नाही ना यासंदर्भात प्रश्न विचारला असता पोलार्ड यांनी लस बनवण्यासाठी पर्यायी सोप्पा मार्ग उपलब्धच नसल्याचे स्पष्ट केलं.

  • 15/15

    लस बनवताना तिचे क्लीनिकल ट्रायल म्हणजेच प्रयोगशाळेत चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे या लसीच्या दर्जाबद्दल शंका घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं पोलार्ड म्हणाले.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Name price side effect and other details about oxford covid 19 vaccine scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.