• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. indian air force know secreat of rafael fighter jet which india purchase from france dmp

आठ विमानांचं काम एकटं ‘राफेल’ करेल, नाक आणि छोटया चेंडूमध्ये आहे ‘सिक्रेट’

July 29, 2020 15:37 IST
Follow Us
  • राफेलला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं. त्यामागे कारण सुद्धा तितकचं खास आहे. एसयू-३५, मिग-३५ आणि युरोफायटर टायफून या स्पर्धक कंपन्यांच्या फायटर विमानांच्या तुलनेत राफेल पूर्णपणे उजवं आहे.
    1/

    राफेलला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं. त्यामागे कारण सुद्धा तितकचं खास आहे. एसयू-३५, मिग-३५ आणि युरोफायटर टायफून या स्पर्धक कंपन्यांच्या फायटर विमानांच्या तुलनेत राफेल पूर्णपणे उजवं आहे.

  • 2/

    शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करुन स्वत:चा बचाव करण्याचं तंत्रज्ञानामुळे राफेल इतर विमानांपेक्षा वेगळं ठरतं. सीरिया, इराक, माली आणि लिबिया युद्धात राफेलने संपूर्ण जगाला आपल्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली. राफेलच्या जन्माची सुरुवात १९८० च्या दशकात झाली. त्यावेळी फ्रान्स, पश्चिम जर्मनी, इटली, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांनी एकत्र येऊन युरोपच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायटर विमान बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला.

  • 3/

    पण लवकरच प्रत्येक देशाची लष्करी गरज आणि रणनिती वेगळी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर फ्रान्सने १९८५ साली या प्रकल्पातून माघार घेत असल्याची घोषणा केली व स्वतंत्रपणे फायटर विमानाच्या निर्मितीवर काम सुरु केलं.

  • 4/

    १९८६ साली राफेलचं पहिलं प्रोटोटाइप जगासमोर आलं. ४ जुलै १९८६ रोजी राफेल ए ने आकाशात यशस्वी झेप घेतली. त्यावेळी ताशी १३०० किलोमीटर या विमानाचा वेग होता. पहिल्याच उड्डाणात राफेल सर्वांच्या पसंतीला उतरलं.

  • 5/

    राफेलचं वैशिष्टय म्हणजे ते एका मल्टीरोल फायटर विमान आहे. राफेलचा जन्म होण्याआधी टेहळणी, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला यासाठी वेगवेगळी विमानं लागायची. पण आता एकटे राफेल ही सर्व कामे करण्यासाठी सक्षम आहे. आठ विमानांची काम एकटं राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटलं जातं.

  • 6/

    राफेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या विमानाची इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, रडार आणि शस्त्रास्त्र विकसित करण्याचं काम सतत सरु असतं. त्यामुळे आज फोर प्लस जनरेशनचं असलेलं हे विमान उद्या ५ जनरेशनमध्ये बदलल्यास आश्चर्य वाटणार नाही.

  • 7/

    राफेल विमान हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. या विमानात २५ किलोमीटर वायरींग असून ३० हजार प्रिसिशन पार्ट्स आहेत. असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट या विमानात आहेत. २० हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करु शकणाऱ्या या विमानाचा ताशी वेग २,१३० किलोमीटर आहे.

  • 8/

    हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीन राफेलमध्ये क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. राफेलच्या नाकामध्ये मल्टीडायरेक्शनल रडार सिस्टिम आहे. युरोपमध्ये हे युनिक तंत्रज्ञान आहे. १०० किलोमीटरच्या रेंजमधील एकाचवेळी ४० टार्गेट शोधण्याची क्षमता यामध्ये आहे.

  • 9/

    राफेलच्या कॉकपीटजवळ छोटया चेंडूच्या आकाराचा ऑप्टीकल कॅमरा सुद्धा या विमानाचं शक्तीस्थळ आहे. रडारने शोधलेल्या टार्गेटसचा माग या कॅमेऱ्याच्या मदतीने काढता येतो. हा कॅमेरा म्हणजे विमानाची दुर्बिण आहे. त्यामुळे राफेलची अचूकतेने प्रहार करण्याची क्षमता कैकपटीने वाढते. राफेलमध्ये एक खास डिजिटल कॅमेरा बसवलेला असून विमान कितीही स्पीडमध्ये असले तरी हा कॅमेरा लक्ष्याचे अचूक फोटो काढू शकतो.

  • 10/

    स्पेक्ट्रा हे राफेलचं सुरक्षा कवच आहे. स्पेक्ट्रा शत्रूचे रडार जॅम करते. त्यामुळे शत्रूच्या रडारला राफेलचा शोध लावता येत नाही. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती सुद्धा स्पेक्ट्रा सिस्टिमकडून मिळते. रडार जॅम केल्यानंतरही एखादे क्षेपणास्त्र विमानाच्या जवळ आले तर विमानातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नॅटिक प्लस विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलतात. हे विमान बनवताना शक्य तितके स्टेल्थ तंत्रज्ञान वापरुन शत्रूच्या हाताला लागणार नाही अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)

Web Title: Indian air force know secreat of rafael fighter jet which india purchase from france dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.