• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. lebanon beirut blasts horrific photos scsg

लेबनान : उद्धवस्त झालेल्या इमारती, धुराचे लोट आणि आक्रोश; पाहा स्फोटांनंतरचे धक्कादायक फोटो

देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट स्फोटांनी हरदरलं

August 5, 2020 08:15 IST
Follow Us
  • मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. (Photo : Twitter/LifeofPegasus)
    1/

    मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. (Photo : Twitter/LifeofPegasus)

  • 2/

    या स्फोटांमध्ये ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Photo : Twitter/greenaugustus44)

  • 3/

    या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेलं नाही. (Photo : Twitter/Fawwazibra)

  • 4/

    अनेक इमारतींचे नुकसान झालं आहे. (Photo : Twitter/C00Qq)

  • 5/

    इंटरनेटवर या स्फोटानंतर अनेक फोटो व्हायरल होत असून हा त्यापैकीच एक फोटो आहे. राजधानीचं शहर स्फोटाआधी कसं होतं आणि नंतर काय झालं हे यामधून दिसत आहे. (Photo : Twitter/AllahdadGhumma)

  • 6/

    हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बैरूट हादरलं. (Photo : TwitterLifeofPegasus)

  • 7/

    देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. (Photo : Twitter/LifeofPegasus)

  • 8/

    पंतप्रधानांनी या स्फोटांमुळे झालेल्या जिवीतहानीसंदर्भातील माहिती दिली आहे. (Photo : Twitter/CGTNOfficial)

  • 9/

    बैरूटमध्ये अवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट झाले. (Photo : Twitter/C00Qq)

  • 10/

    हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. (Photo : Twitter/LebaneseProblem)

  • 11/

    कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. (Photo : Twitter/CGTNOfficial)

  • 12/

    अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधूस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या. (Photo : Twitter/LebaneseProblem)

  • 13/

    बंदराजवळच्या भागात झालेल्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या मोठ्या परिसराचे नुसान झालं आहे. रेड क्रॉस, जागतिक आरोग्य संघटना यासारख्या मोठ्या संघटनांनी तात्काळ मदत करण्याचे आवाहन केलं आहे. (Photo : Twitter/Syriaaaaidlb)

  • 14/

    स्फोटानंतर अनेक जखमी नागरिक अशाप्रकारे रुग्णालयांबाहेर उपचारासाठी वाट पाहताने भयानक चित्र पाहायला मिळालं.(Photo : Twitter/greenaugustus44)

  • 15/

    स्फोट झालेल्या ठिकाणी तर काही गाड्यांना आगही लागल्याची माहिती समोर आली आहे. (Photo : Twitter/LifeofPegasus)

  • 16/

    अनेक मैलांवरुन या स्फोटामुळे निर्माण झालेला धूर आणि आगीचे लोळ पहायला मिळाले.(Photo : Twitter/C00Qq)

  • 17/

    बैरूट या स्फोटांमुळे बेचिराख झालं आहे. (Photo : Twitter/CGTNOfficial)

  • 18/

    लेबनानमधील यंत्रणा आधीच करोना संसर्गाशी दोन हात करत असतानाच या स्फोटामुळे रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. या स्फोटांनंतर शहरामध्ये अगदी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. (Photo : Twitter/leenagn)

  • 19/

    अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुसान झालं आहे. (Photo : Twitter/LebaneseProblem)

  • 20/

    या स्फोटांमधील ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र काही वृत्तवाहिन्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागल्याने हे स्फोट झाले. (Photo : Twitter/cnnbrk)

  • 21/

    तर या स्फोटांनंतर नारंगी रंगाचे ढग स्फोट झालेल्या प्रदेशाच्या वर दिसून आल्याने स्थानिक प्रसारमाध्यमांनी सोडियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र यावर अधिकृतरित्या कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. (Photo : Twitter/MingisDesire)

Web Title: Lebanon beirut blasts horrific photos scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.