• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. military option on table if talks fail rawat on china dmp

…तर चीन विरोधात लष्करी कारवाई, CDS बिपीन रावत यांच मोठं विधान

August 24, 2020 08:37 IST
Follow Us
  • भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी लडाखमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे. (फोटो सौजन्य - एपी)
    1/

    भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी लडाखमध्ये सुरु असलेल्या घडामोडींबाबत मोठं विधान केलं आहे. (फोटो सौजन्य – एपी)

  • 2/

    पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओसह काही भागातून चीन मागे हटायला तयार नाहीय. लष्करी स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अजूनही हा पेच सुटू शकलेला नाही. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीडीएस बिपीन रावत यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

  • 3/

    संग्रहित छायाचित्र

  • 4/

    दोन देशांमधील लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेतून काही तोडगा निघाला नाही, चर्चा निष्फळ ठरली तरच लष्करी पर्याय वापरावा लागेल असे बिपीन रावत यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 5/

    "सीमारेषेबद्दल वेगवेगळया धारणेमुळे एलएसीवर अतिक्रमण होते. संरक्षण दलांवर सीमेवर लक्ष ठेवण्याची, टेहळणीची आणि अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी असते. अशा कुठल्याही घटनेवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा आणि घुसखोरी रोखण्याचा मार्ग सरकारकडून अवलंबला जातो. संरक्षण दलं लष्करी कारवाईसाठी नेहमीच सज्ज असतात" असे सीडीएस रावत हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हणाले. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 6/

    "लडाखमध्ये आधी होती, तशी जैसे थे स्थिती कायम व्हावी यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी असणारे सर्वजण उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार करत आहेत" असे सीडीएस रावत यांनी सांगितले. (Source: Twitter @ChinarcorpsIA)

  • 7/

    २०१७ साली डोकलाममध्ये ७३ दिवस भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने होते. त्यावेळी आताचे सीडीएस बीपिन रावत लष्करप्रमुख होते. (फोटो सौजन्य – पीटीआय)

  • 8/

    "प्रमुख गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा समज चुकीचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारताकडे हिंदी महासागर क्षेत्रासह उत्तर आणि पश्चिम सीमांवर विशाल फ्रंट लाइन आहे" त्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे असे रावत म्हणाले. (PTI)

  • 9/

    गलवान खोऱ्यासह काही भागातून चीन मागे हटला आहे पण पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चीन मागे हटायला तयार नाहीय त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद आहे.

  • 10/

    भारत आणि चीन दोन्ही देश सीमारेषेवर परस्परांच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले होते.

Web Title: Military option on table if talks fail rawat on china dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.