-
गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय जवानांच्या झालेल्या चकमकीनंतर भारतात चीनविरोधी भावना जोर धरू लागली होती. तसंच भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कारही टाकण्यात येत आहे.
-
यावरून चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चायना इन्स्टिट्यूट ऑफ केंटेंपरेररी इंटरनॅशनल रिलेशन्ससोबक एकत्र येत एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात १९६० जणांनी सहभाग घेतला होता. मोदी सरकारपासून ते भारतीय लष्कर, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारत-चीन संबंधांबाबत अनेक प्रश्न विचारयावरून चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चायना इन्स्टिट्यूट ऑफ केंटेंपरेररी इंटरनॅशनल रिलेशन्ससोबक एकत्र येत एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात १९६० जणांनी सहभाग घेतला होता. मोदी सरकारपासून ते भारतीय लष्कर, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारत-चीन संबंधांबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. ण्यात आले.
-
दरम्यान, ७० टक्के लोकांनी भारत चीनप्रती अधिक शत्रूत्व दाखवत असल्याचं म्हटलं. तसंच याविरोधात चीननं कारवाई केल्यास त्याचं समर्थन करणार असल्याचंही नमूद केलं.
-
या सर्वेक्षणात तब्बल ५१ टक्के लोकांनी मोदी सरकारप्रती पसंती दर्शवली आहे. तर ९० टक्के लोकांनी भारताविरोधातील चीनच्या लष्करी कारवाईचं समर्थन केलं.
-
चीनमधील नागरिकांनी मोदी सरकारला पसंती दर्शवल्याचा भाग ग्लोबल टाईम्सनं काढऊन टाकला होता. परंतु ग्लोबल टाईम्सनं सर्वेक्षणाचा काही भाग ट्वीट केला होता. त्यात अद्यापही यासंदर्भातील काही माहिती उपलब्ध आहे.
-
दरम्यान, भविष्यकाळात भारतानं सीमावाद निर्माण केल्यास सुरक्षेसाठी कारवाई करण्यासाठी ९० टक्के लोकांनी आपली सहमती दर्शवली आहे.
-
तर दुसरीकडे २६.४ टक्के लोकांनी भारत हा शेजारी देश असल्यामुळे आवडत्या देशांच्या यादीत भारताला चौथा क्रमांक दिल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. भारतापूर्वी रशिया, पाकिस्तान आणि जपान या देशांना चिनी नागरिकांनी पसंती दर्शवली आहे.
-
१७ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. ग्लोबल टाईम्सनं चीनमधील बीजिंग, शांघाय, शियान, वुहान, चेंगडू, झेंगझाऊ यांसह १० देशांमध्ये सर्वेक्षण केलं.
-
चीनमधील नागरिकांना भारतीय संस्कृतीबाबत चांगली माहिती नसल्याचं मानलं जातं. परंतु सर्वेक्षणातून वेगळीच माहिती समोर आली. ५६ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना भारतीय संस्कृतीची चांगली तर १६ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना सर्वाधिक माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं.
-
"लोकांनी आपल्याला जेवढी माहिती आहे हे सांगितलं ते तथ्यापासून विपरीत आहे. चीनमधील लोक अमेरिका, जपान आणि युरोपबाबत भारतापेक्षा अधिक माहिती आहे. सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांमध्ये फरक आहे आणि नागरिकांमधील परस्पर संवादही कमी आहे," असं मत सेंटर फॉर स्टडिज ऑफ फूडान यूनिव्हर्सिटीटे उपसंचालक लिन मिनवांग ने ग्लोबल टाईम्सशी बोलताना सांगितलं.
-
चीनच्या चांगल्या शेजारी राष्ट्रांमध्ये दक्षिण कोरियापेक्षा चांगल स्थान भारताला देण्यात आलं आहे. दरम्यान, भारतातील सरकार देशातील लोकांना चीनविरोधात भडकावत असल्याचा आरोपही ग्लोबल टाईम्सनं केला आहे.
-
अनेक मुद्द्यांवर चीन आणि भारतादरम्यान मतभेद आहेत. परंतु अनेक बॉलिवूडचे चित्रपट चीनमध्ये लोकप्रिय आहेत. अनेक चिनी नागरिक योग करतात. सर्वेक्षणात २३ टक्के लोकांनी भारताला योगाशी जोडून पाहिल्याचंही सांगण्यात आलं आहे.
-
२५ टक्के लोकांनी भारत-चीनदरम्यानच्या संबंधांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं. पुढील काळात दोन्ही देशांमधील संबंध उत्तम होतील असंही त्यांचं म्हणणं आहे. तर ७० टक्के लोकांनी भारत गरजेपेक्षा अधिक शत्रूत्व दाखवत असल्याचं म्हटलंय.
-
सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार ५७ टक्के लोकांनी भारत चीनसाठी धोकादायक ठरू शकणार नसल्याचं म्हटलं. तर ४९ टक्के लोकांनी भारतीय अर्थव्यवस्था चीनवर अवलंबून असल्याचा दावा केला.
-
सर्वेक्षणात ५४ टक्के लोकांनी भारत चीनला मागे टाकू शकत नसल्याचं म्हटलं. तर १०.४ टक्के लोकांनी हे १०० वर्षांनी होऊ शकेल असं म्हटलं.
मोदी भारतातच नाही तर चीनमध्येही लोकप्रिय; सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी पाहाच
Web Title: More than 50 chinese citizens like pm narendra modi government china news paper global times survey jud