• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra challenges in front of hotels eateries bars to start operating from oct 5 scsg

हॉटेल, बार आजपासून पुन्हा सुरु होणार, मात्र हॉटेल व्यसायिकांना ‘या’ आव्हानांना तोंड द्यावे लागणार

शासनाच्या नव्या अटी पाळून सुरु होणारा व्यवसाय

October 5, 2020 08:11 IST
Follow Us
  • लॉकडाउनच्या शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात आजपासून महाराष्ट्रामधील उपाहारगृहे, मद्यालये सुरू होत आहेत. मात्र अनेक महिन्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरु करताना अनेक प्रश्न हॉटेल मालकांसमोर आहेत. याच आव्हानांचा घेतलेला हा आढावा...
    1/

    लॉकडाउनच्या शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात आजपासून महाराष्ट्रामधील उपाहारगृहे, मद्यालये सुरू होत आहेत. मात्र अनेक महिन्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरु करताना अनेक प्रश्न हॉटेल मालकांसमोर आहेत. याच आव्हानांचा घेतलेला हा आढावा…

  • 2/

    मात्र, थकलेल्या भाडय़ावरून सुरू असलेले वाद, ग्राहकांच्या प्रतिसादाबाबत साशंकता आणि शासनाच्या अटी पाळून होणारा व्यवसाय या मुद्दय़ांमुळे मुंबई शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी सावध भूमिका घेतली आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 3/

    २२ हजारांहून अधिक उपाहारगृहे, मद्यालयांपैकी ३० टक्के सोमवारपासून सुरू होतील, असा अंदाज हॉटेल मालकांच्या संघटनेने व्यक्त केला. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 4/

    ६० टक्के उपाहारगृहे, मद्यालये भाडय़ाच्या जागेत सुरू आहेत. टाळेबंदीतील सहा महिने बहुतांश व्यावसायिकांचे जागेचे भाडे थकले आहे. (फोटो सौजन्य : स्वपन महापात्रा/पीटीआय)

  • 5/

    आस्थापना पुन्हा सुरू करण्यापूर्वी थकलेल्या भाडय़ावरून बहुतांश व्यावसायिकांचे जागा मालकांशी वाद, वाटाघाटी सुरू आहेत. (फोटो सौजन्य : मितेश भूवड/पीटीआय)

  • 6/

    एका हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, परिसर आणि क्षेत्रफळानुसार मुंबईत पाच ते २५ लाखांपर्यंत जागेचे मासिक भाडे आहे. (फोटो सौजन्य : अशोक भौमिक/पीटीआय)

  • 7/

    हॉटेल किंवा मद्यालये सुरू करण्यापूर्वी काही जागा मालकांनी व्यावसायिकांकडे थकलेले भाडे मागितले. त्यामुळे अशा व्यावसायिकांना इच्छा असूनही उपाहारगृहे किंवा मद्यालये सुरू करणे शक्य नाही. हा व्यवसाय नव्याने उभा करावा लागेल. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 8/

    सर्वप्रथम ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करावा लागेल, अशी प्रतिक्रिया ‘आहार’ या हॉटेल मालकांच्या संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी व्यक्त केली. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 9/

    शासनाने ग्राहकांच्या संख्येबाबत घातलेली अट पाळून व्यवसाय केल्यास वीज, कामगारांचा पगार, अन्नपदार्थासाठी लागणाऱ्या चीजवस्तूंचा खर्च आणि उत्पन्न याबाबतही अनेक व्यावसायिक साशंक आहेत. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 10/

    टाळेबंदीमुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. प्रत्येक कुटुंब सावधगिरीने पैसे खर्च करीत आहे. अशा परिस्थितीत उपाहारगृहे, मद्यालयांना ग्राहकवर्ग मिळेल का, ही शंकाही व्यावसायिकांच्या मनात आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. (फोटो सौजन्य : स्वपन महापात्रा/पीटीआय)

  • 11/

    मार्चच्या अखेरीस बंद पडलेली उपाहारगृहे पुन्हा सुरू करताना ताट-वाटय़ांपासून वातानुकूलन यंत्रांची डागडुजी, नवी आसनव्यवस्था  क्रमप्राप्त आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 12/

    टाळेबंदीत कामगार गावी निघून गेल्याने मोजक्या व्यावसायिकांच्या हाताशी पुरेसे मनुष्यबळ आहे. (फोटो सौजन्य : शैलेंद्र भोजक/पीटीआय)

  • 13/

    त्यामुळे ग्राहकांचा अंदाज, थकलेल्या भाडय़ांबाबतचे वाद मिटवून व्यवसाय सुरू करण्याकडे बहुतांश व्यावसायिकांचा कल आहे. (फोटो सौजन्य : मितेश भूवड/पीटीआय)

  • 14/

    मात्र, खर्च आणि उत्पन्न यांच्यात ताळमेळ घालण्याचे आव्हान व्यावसायिकांपुढे असल्याचे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. (फोटो सौजन्य : शैलेंद्र भोजक/पीटीआय)

  • 15/

    आज हॉटेल्सला किती प्रतिसाद मिळतो यावर पुढील वाटचाल अवलंबून असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आज किती जणांची पावले सहा महिन्यानंतर हॉटेलकडे वळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य : स्वपन महापात्रा/पीटीआय) (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)

Web Title: Maharashtra challenges in front of hotels eateries bars to start operating from oct 5 scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.