• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. karjat jamkhed mla rohit pawars mother sunanda pawar participated in cleanness drive scsg

आईने केलेलं श्रमदान पाहून रोहित पवार म्हणतात…

रोहित पवार यांनी शेअर केले फोटो

October 12, 2020 14:05 IST
Follow Us
  • कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. रोहित यांनीच ट्विटर आणि फेसबुकवरुन आपल्या आईचे काही फोटो शेअर करत, 'थोर तुझे उपकार आई!' असं म्हटलं आहे.
    1/

    कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. रोहित यांनीच ट्विटर आणि फेसबुकवरुन आपल्या आईचे काही फोटो शेअर करत, 'थोर तुझे उपकार आई!' असं म्हटलं आहे.

  • 2/

    आमदार रोहित दादा पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आणि रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील अनेक उपक्रमातून रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातुन विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)

  • 3/

    स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जत जामखेड मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या असून जातीने या दोन्ही शहरातील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेवून संवाद साधून स्वच्छते संदर्भात जागृती करत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)

  • 4/

    केवळ जागृतीच नाही तर सुनंदा पवार स्वतः हातात खोरे-टिकाव घेवून अधिकाऱ्यांसोबत श्रमदान करताना दिसत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)

  • 5/

    सुनंदा पवार यांच्या सोबत राजकीय पदाधिकारी,शासकीय अधिकारी,नगरपंचायत,रोटरी क्लब,हरित अभियान, बीजेएस,आजी माजी सैनिक संघटना,एन.एस.एस, एन.सी.सी,पत्रकार संघटना,सामाजिक संघटना,विद्यार्थी,ग्रामस्थ या स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत झोकून देऊन काम करत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)

  • 6/

    रोहित पवार यांनी आमदारकीची शपथ घेताना आपल्या आईने नाव आवर्जून घेतले होते. त्यावेळीही या मायलेकांमधील नात्याबद्दल सोशल मीडियावर भरभरुन बोललं गेलं होतं. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)

Web Title: Karjat jamkhed mla rohit pawars mother sunanda pawar participated in cleanness drive scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.