Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. armenia pms wife starts combat training amid tensions with azerbaijan dmp

आर्मेनियाच्या पंतप्रधानांच्या पत्नी युद्ध लढण्यासाठी जाणार नागोर्नो-काराबाखमध्ये

Updated: September 9, 2021 18:38 IST
Follow Us
  • आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांची पत्नी लवकरच सीमेवर युद्ध लढण्यासाठी जाणार आहे. (सर्व फोटो सौजन्य - अन्‍ना हाकोब्‍यान इन्स्टाग्राम)
    1/8

    आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांची पत्नी लवकरच सीमेवर युद्ध लढण्यासाठी जाणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – अन्‍ना हाकोब्‍यान इन्स्टाग्राम)

  • 2/8

    निकोल पाशिनयान यांची पत्नी अन्‍ना हाकोब्‍यान यांनी त्यासाठी लष्करी प्रशिक्षण सुरु केले आहे. त्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

  • 3/8

    नागोर्नो-काराबाख भागामध्ये आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये भीषण लढाई सुरु आहे. अन्‍ना हाकोब्‍यान लवकरच तिथे जाऊन अजरबैजान विरुद्ध युद्ध लढणार आहेत.

  • 4/8

    १३ सदस्यीय महिला पथकाचे लवकरच लष्करी प्रशिक्षण सुरु होणार आहे, असे ४२ वर्षीय अन्‍ना हाकोब्‍यान यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या १३ सदस्यीय पथकामध्ये त्या सुद्धा आहेत. एएफपीने हे वृत्त दिले आहे.

  • 5/8

    "आमच्या सीमेच्या रक्षणासाठी सैन्य दलाच्या मदतीसाठी लवकरच आम्ही निघू. आमची मातृभूमी आणि आत्मसन्मानाचे आम्ही शत्रूसमोर आत्मसमर्पण करणार नाही" असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

  • 6/8

    आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतरचा त्यांचा हा दुसरा लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

  • 7/8

    मागच्याच महिन्यात हाकोब्यान आणि काराबाखमधील महिलांच्या गटाला लष्करी तळावर सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा कसा वापर करायचा, हे त्यांना तिथे शिकवण्यात आले.

  • 8/8

    सप्टेंबरपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु आहे. आतापर्यंत त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि अमेरिकेने स्वतंत्रपणे तीन वेळा शस्त्रसंधी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या भागात तणाव कायम वाढत आहे.

Web Title: Armenia pms wife starts combat training amid tensions with azerbaijan dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.