-
शालेय जीवनापासून मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात पृथ्वी शॉ च्या नावाची चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ चा आज वाढदिवस आहे. पृथ्वीने आज वयाच्या २१ व्या वर्षात पदार्पण केले. (सर्व फोटो सौजन्य – पृथ्वी शॉ इन्स्टाग्राम)
-
पृथ्वी शॉ पहिल्यांदा २०१३ साली वयाच्या १४ व्या वर्षी चर्चेत आला. त्यावेळी त्याने रिजवी स्कूलकडून खेळताना अंडर-१६ शालेय क्रिकेट स्पर्धेत ३०० चेंडूत ५४६ धावा तडकावून जागतिक विक्रम केला होता.
-
पृथ्वी शॉ ने रणजी आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सलामीच्या सामन्यात शतक ठोकून सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
-
आयपीएलच्या या मोसमात पृथ्वी शॉ ला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्याने १७.५३ च्या सरासरीने १३ सामन्यात २२८ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या क्वालिफायटर एकमध्ये पृथ्वी शॉ ला संघात स्थान देण्यात आले होते. पण सततच्या अपयशामुळे हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर दोनच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले.
-
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या नऊ सामन्यात पाच शतके झळकवण्याचा विक्रम पृथ्वी शॉ च्या नावावर आहे. पृथ्वीचे बालपण खूप संघर्षमय होते. क्रिकेटच्या सरावासाठी त्याला दोन तास प्रवास करावा लागायचा.
-
संजय पोतनीस आता कलिना विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. पण त्याआधी ते नगरसेवक असताना एकदिवस वांद्रयाच्या एमआयजी क्लबवर मित्रासोबत गेले होते. योगायोग म्हणजे पृथ्वी शॉ तिथे सराव करत होता. पृथ्वीच्या फलंदाजीच्या कौशल्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. संजय पोतनीस यांना त्याची फलंदाजी आवडली. त्यांनी पृथ्वीकडे विचारणा केली. पृथ्वीला क्रिकेटसाठी जो संघर्ष करावा लागत होता, ते ऐकून त्यांना वाईट वाटले.
-
पृथ्वी आज यशस्वी क्रिकेटपटू असला तरी त्याच्या संघर्षमय प्रवासाबद्दल फार कमी जणांना माहित आहे. शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी त्याला मोलाची मदत केली आहे.
-
संजय पोतनीस स्वत: चांगले खेळाडू होते. योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर काय होते? याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी पृथ्वीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पैसा आणि अन्य शक्य असेल त्या सर्व मार्गाने पृथ्वीला मदत केली. जेणेकरुन त्याला त्याचे स्वप्न साकार करता यावे. पृथ्वी वाकोल्यात आला. तो संजय पोतनीस यांच्या कुटुंबासोबत राहत होता. रिपब्लिक वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.
-
संजय पोतनीस यांचा सुप्रीमो फाऊंडेशन क्लब आहे. संजय पोतनीस आपल्या क्लबच्या ग्राऊंडवर पृथ्वीला सरावासाठी घेऊन जायचे. त्यावेळी क्लबमधले ३० गोलंदाज पृथ्वीला फलंदाजीचा सराव व्हावा, यासाठी गोलंदाजी करायचे.
-
पृथ्वी एका मारवाडी कुटुंबातून येतो. पण मुंबईत लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याला उत्तम मराठी बोलता येते. “प्रतिभासंपन्न पृथ्वी शॉ तू भारताचं वर्तमान आणि भविष्य आहेस. तुला तूझा हरवलेला सूर सापडेल अशी मला अपेक्षा आहे. त्यासाठी मेहनत हा एकमेव मार्ग आहे. आज तुझा दिवस आहे. तू शतक साजरं करतोस, तसा आजचा दिवस साजरा करं” असे युवराजने त्याच्या शुभेच्छा संदेशाच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
शनी महाराज निघाले चांदीच्या पावलांनी; ‘या’ राशींमध्ये होणार उलाढाली! वर्षभर शनिदेव देणार पैसाच पैसा, मिळू शकते मोठं सरप्राईज