-
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी फायझर आणि जर्मन बायोएनटेक कंपनीने मिळून विकसित केलेली लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं फेज तीनच्या मानवी चाचण्यांमधून समोर आलं आहे.
-
कंपनीने सोमवारी करोनावरील लस ९० टक्के परिणामकारक असल्याची मोठी घोषणा केली. (Photo: Reuters)
-
लशीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनी शरीरात करोनापासून बचाव करणाऱ्या घटकांची निर्मिती झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. (Photo: Reuters)
-
Covid-19 ला रोखण्याची आमच्या लशीमध्ये क्षमता असून फेज तीनच्या चाचणीतून ते समोर आले आहे असे फायझरचे अध्यक्ष आणि सीईओंनी सांगितले. (Photo: AP)
-
करोनामुळे निर्माण झालेल्या या जागतिक आरोग्य संकटातून लोकांची सुटका करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या शोधाच्या आम्ही जवळ पोहोचलो आहोत असे फायझरच्या सीईओंनी म्हटले आहे.
-
जगभरात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना या व्हायरसची लागण झाली असून लाखो लोकांचा या जीवघेण्या करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. (Photo: Reuters)
-
अमेरिकेने करोना व्हायरसवरील लस संशोधनावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे आणि त्याचे परिणामही आता दिसत आहे.
-
फायझर, मॉर्डना या कंपन्यांनी करोना विरोधात विकसित केलेल्या लशी तिसऱ्या आणि निर्णायक फेजमध्ये आहेत.
-
ऑक्सफर्डची लसही तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात आहे. जगातील अनेक देशांमध्ये ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या सुरु आहे.
-
भारतात सिरम निर्मिती करणारी ऑक्सफर्डची लस आणि भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सीन या लशी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.
करोना लशी संदर्भात फायझर कंपनीची मोठी घोषणा, तिसऱ्या फेजमधून समोर आला महत्त्वाचा निष्कर्ष
Web Title: Covid vaccine ninety percent effective in phase three trial says pfizer dmp