Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. 30 million doses of oxford vaccine ready in australia scsg

दिलासादायक… ऑस्ट्रेलियात ऑक्सफोर्डच्या लस निर्मितीला सुरुवात; तीन कोटी डोस तयार

आरोग्यमंत्र्यांनाहीच दिली महत्वपूर्ण माहिती

November 10, 2020 15:22 IST
Follow Us
  • करोना संकटाचा सामना करणाऱ्या जगभरातील देशांना ऑस्ट्रेलियाने मोठा दिलासा दिला आहे. ऑस्ट्रेलियातील सीएसएल लिमिटेड कंपनीने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका ने करोनावरील लशीची निर्मिती सुरु केली आहे.
    1/10

    करोना संकटाचा सामना करणाऱ्या जगभरातील देशांना ऑस्ट्रेलियाने मोठा दिलासा दिला आहे. ऑस्ट्रेलियातील सीएसएल लिमिटेड कंपनीने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका ने करोनावरील लशीची निर्मिती सुरु केली आहे.

  • 2/10

    ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सोमवारीपर्यंत कंपनीच्या व्हिक्टोरिया येथील प्लॅण्टमध्ये करोनाच्या तीन कोटी लशी निर्माण करण्यात आल्यात.

  • 3/10

    सिडनीमधील के टू जीबी रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्री ग्रेग हुंट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (फोटो सौजन्य: एपी)

  • 4/10

    "ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या करोना लशीचा डोस घेणं हे ऐच्छिक असणार आहे. मात्र आम्ही जास्तीत जास्त लोकांना ही लस घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत," असं हुंट म्हणाले आहेत.

  • 5/10

    "आमच्याकडे देशातील लोकसंख्येपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लशी उपलब्ध आहेत," असा विश्वासही हुंट यांनी व्यक्त केला आहे. 

  • 6/10

    मार्च महिन्यापासून सर्व सामान्यांना करोनाची ही लस दिली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

  • 7/10

    सिडनीमधील मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार लशीची निर्मिती करणाऱ्या सीएसएल कंपनीला ही लस बाजारात आणण्यासाठी ५० दिवसांचा वेळ लागेल.

  • 8/10

    ऑस्ट्रेलियामध्ये तयार करण्यात आलेल्या या लशीच्या निर्मिती आणि वितरणासंदर्भात एस्ट्राजेनेका आणि ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये अनेक करार झाल्याचेही समजते. 

  • 9/10

    ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लशीला अद्याप ऑस्ट्रेलियातील आरोग्य यंत्रणेने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. 

  • 10/10

    या वर्षाच्या शेवटपर्यंत या लशीची शेवटची आणि तिसरी चाचणी पूर्ण होईल असं सांगितलं जातं आहे.

Web Title: 30 million doses of oxford vaccine ready in australia scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.