• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bihar cabinet portfolios nitish kumar keeps home deputy tarkishore prasad gets finance and other details scsg

बिहारचे नवे सरकार : राज्याची आर्थिक सुत्रं १२ पास नेत्याकडे तर शिक्षक भरती घोटळ्यातील नेता शिक्षणमंत्री

जाणून घ्या नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये कोणाकोणाला देण्यात आलीय संधी

Updated: September 9, 2021 18:35 IST
Follow Us
  • बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाप्रणीत एनडीएची सत्ता आली आहे. जनता दल युनायटेड आणि भाजपा आघाडीला बिहारच्या जनतेने चौथ्यांदा सत्तेचा कौल दिला. काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये मात्र एक गोष्ट बदलली आहे. आता भाजपा बिहारमध्ये मोठया भावाच्या भूमिकेत असणार आहे. यापूर्वी जेडीयूचा वरचष्मा होता. (सर्व फोटो फेसबुक आणि ट्विटवरुन साभार)
    1/20

    बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपाप्रणीत एनडीएची सत्ता आली आहे. जनता दल युनायटेड आणि भाजपा आघाडीला बिहारच्या जनतेने चौथ्यांदा सत्तेचा कौल दिला. काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये मात्र एक गोष्ट बदलली आहे. आता भाजपा बिहारमध्ये मोठया भावाच्या भूमिकेत असणार आहे. यापूर्वी जेडीयूचा वरचष्मा होता. (सर्व फोटो फेसबुक आणि ट्विटवरुन साभार)

  • 2/20

    सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी खातेवाटप जाहीर झाले आहे. बिहारमध्ये गृह खाते कोणाकडे जाणार? याबद्दल उत्सुक्ता होती. कारण भाजपाचे संख्याबळ जास्त असल्याने गृहखाते भाजपाच्या मंत्र्याकडे जाणार की, नितीश कुमार हे खाते आपल्याकडेच ठेवणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण सरकारमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असूनही नितीश कुमार गृहखाते आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. मात्र नितीश यांच्या मंत्रीमंडळातील काही नावांमुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. खास करुन राज्याचे नवे अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांचा इतिहास पाहता खातेवाटपानंतर लगेचच विरोधकांनी नितीश सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 3/20

    भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांना महत्त्वाचे अर्थ खाते मिळाले आहे. त्याशिवाय पर्यावरण, वन, माहिती-तंत्रज्ञान अशा एकूण सहा खात्यांचा कार्यभार सुद्धा त्यांच्याकडेच असेल. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या प्रसाद यांच्या वाट्याला अर्थ, पर्यावरण, वन, महिती-तंत्रज्ञान या चार महत्वाच्या खात्यांबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, नगर विकास मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. एवढी महत्वाची खाती आणि मंत्रालये तारकिशोर प्रसाद यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता.

  • 4/20

    तारकिशोर प्रसाद यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या एनडीएने महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन अनेकदा टोले लागवल्याचे पाहायला मिळालं. तेजस्वी यांनी दहावी पर्यंतचेही शिक्षण पूर्ण केलेलं नाही असं अनेकदा प्रचारसभांमधून सांगण्यात आलं. मात्र आता सत्ता आल्यानंतर भाजपा आणि जदयुने १२ वी पास नेत्याला अर्थ खातं दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आरजेडीचे प्रमुख प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी तेजस्वी यांच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना काय झालं. त्यांनी पहिल्यांदा मंत्री झालेल्या नेत्याला अर्थ खातं कसं काय दिलं असा प्रश्न विचारला आहे. 

  • 5/20

    नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये मंत्रीपद मिळालेलं आणखीन एक नाव म्हणजे मेवालाल चौधरी. चौधरी हे सुद्धा वादग्रस्त नेतृत्व असून त्यांच्या खांद्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मेवालाल चौधरी २०१५ मध्ये पहिल्यांदा जेडीयूच्या तिकीटावर आमदार झाले होते. त्यापूर्वी ते शिक्षक म्हणून काम करायचे. चौधरी हे सबौर कृषि विश्वविद्यालयाच्या कुलपती असताना २०१२ साली सहाय्यक प्राध्यपक आणि कनिष्ठ संशोधकांची भरती करण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • 6/20

    बिहारमध्ये १८ आणि इतर राज्यांमध्ये ८७ जणांना नियमांचे उल्लंघन करुन चौधरी यांनी नियुक्त केल्याचे आरोप करण्यात आले. सबौर पोलीस स्थानकामध्ये २०१७ साली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये चौधरी यांना न्यायलयाने अंतरिम जामीन दिला होता. तसेच न्यायालयाने चौधरी यांच्याविरोधात चार्टशीट दाखल केली नव्हती. 

  • 7/20

    नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये जीवेश कुमार यांना पर्यटन, कामगार आणि खाण मंत्रालय देण्यात आलं आहे. जीवेश हे सुद्धा वादग्रस्त नेतृत्वांपैकी एक आहेत. जीवेश यांनी करोना कालावधीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांवर निर्बंध लावण्यात आलेले असताना जीवेश मात्र दिल्लीपासून थेट दरभंगापर्यंत आले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्येही दौरा केला होता. मात्र एवढं करुनही त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली नव्हती.

  • 8/20

    एकीकडे दिल्ली-पंजाब आणि दक्षिणेतील राज्यांमधून बिहारमधील मजूर पायी चालत आल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र दुसरीकडे जीवेश यांना या सर्व नियमांमधून सूट देण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले.

  • 9/20

    मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत सामान्य प्रशासन आणि अन्य महत्त्वाची खाती नितीश कुमार यांच्याकडेच असतील

  • 10/20

    नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये १४ मंत्र्यांचा शपथविधी झाला. 

  • 11/20

    भाजपाकडून सात, जेडीयूकडून पाच तसेच एचएएम आणि व्हीआयपीकडून प्रत्येकी एकाने मंत्रिपदाची शपथ घेतली. 

  • 12/20

    भाजपा आमदार आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांना पंचायत राज मंत्रालय देण्यात आले आहे.  त्याचप्रमाणे मागास आणि अती मागास कल्याण तसेच उद्योग विभागाची जबाबदारीही रेणू देवींना देण्यात आली आहे. 

  • 13/20

    नितीश यांचे निकटवर्तीय असणाऱ्या विजय कुमार चौधरी यांना ग्रामविकास, जलंसंपदा, सूचना-जनसंपर्क तसेच संसदीय कार्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 14/20

    विजय कुमार चौधरी हे मागील विधानसभेमध्ये स्पीकर होते. 

  • 15/20

    जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष अशोक चौधरी यांना गृहनिर्माण, समाज कल्याण, अल्पसंख्यांक तसेच विज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 16/20

    विजेंद्र यादव यांना ऊर्जा, दारुबंदी, खाद्य तसेच ग्राहकांशी संबंधित उपभोक्ता विभागाशी संबंधित मंत्रालये देण्यात आली आहेत.

  • 17/20

    शीला कुमारी यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

  • 18/20

    हिदुस्तानी अवाम मोर्चा या पक्षाचे नेते जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन यांना लघू, जल संपदा, अनुसूचित जाती/जमाती कल्याण मंत्रालय देण्यात आलं आहे.

  • 19/20

    विकासशील इन्सान पार्टीचे नेते मुकेश सहनी यांना पशू तसेच मत्स्य संवर्धन मंत्रालय देण्यात आलं आहे. 

  • 20/20

    बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देतानाच भाजपाने दोन उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे ठेवली आहेत.

Web Title: Bihar cabinet portfolios nitish kumar keeps home deputy tarkishore prasad gets finance and other details scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.