• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress senior leader ahmed patel dies know his networth and family income scsg

Photos : अहमद पटेल यांच्या कुटुंबाकडे किती संपत्ती आहे?

वयाच्या ७१ व्या वर्षी अहमद पटेल यांचे करोनामुळे निधन झालं

November 25, 2020 10:41 IST
Follow Us
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
    1/15

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

  • 2/15

    एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

  • 3/15

    पटेल यांना काँग्रेसचे चाणक्य आणि सोनिया गांधीचे विश्वासू सहकारी म्हणून भारतीय राजकारणामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. सोनिया गांधी यांना भारतीय राजकारणामध्ये स्थिरावण्यासाठी सर्वात मोठा हातभार हा पटेल यांचा होता असं राजकीय जाणकार सांगतात.

  • 4/15

    पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसचा कारभार संभाळणाऱ्या सोनिया यांना पटेल यांनी मोठा आधार दिला. पटेल हे गुजरामधून राज्यसभेवर काँग्रेसचे खासदार होते. पटेल हे काँग्रेसचे कोषाध्यक्षही होते. पटेल यांच्या पश्चात पटेल कुटुंबाकडे किती संपत्ती आहे यावर टाकलेली ही नजर…

  • 5/15

    अहमद पटेल यांच्या संपत्तीमध्ये २०११ ते २०१७ या सहा वर्षांच्याकालावधीमध्ये २३ टक्क्यांनी वाढ झाली. मायनेता डॉट इन्फो या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

  • 6/15

    अहमद पटेल यांची वर्षिक उत्पन्न १५ लाख १० हजार १४७ रुपये इतके होते. 

  • 7/15

    प्रतिज्ञापत्रानुसार अहमद पटेल यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीचे एकूण मूल्य सहा कोटी ५१ लाख नऊ हजार ८०३ रुपये इतके आहे.

  • 8/15

    याचबरोबर पटेल यांनी एक कोटींहून अधिक म्हणजेच एक कोटी १७ लाखांपेक्षा अधिक पैसे बचत खात्यामध्ये आहेत. 

  • 9/15

    अहमद पटेल यांचा मुलाच्या तसेच मुलीच्या उत्पन्नाबद्दल या प्रतिज्ञापत्रात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

  • 10/15

    पटेल यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४९ रोजी गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील पिरमण गावामध्ये झाला होता. 

  • 11/15

    पटेल हे तीन वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. १९७७ ते १९८९ दरम्यान ते लोकसभेत खासदार होते तर त्यानंतर पाच वेळा (१९९३ ते २०२०) त्यांना काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी दिली होती. 

  • 12/15

    अहमद पटेल यांनी पहिल्यांदा १९७७ साली भरुच लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. तेव्हा ते ६२ हजारांहून अधिक मतांनी निवडून आले होते.

  • 13/15

    त्यानंतर १९८० साली अहमद पटेल भरुचमधून ८२ हजारांहून अधिक मतांनी तर नंतर १९८४ साली एक लाख २३ हजारांहून अधिक मतांनी निवडून आले होते. मागील २८ वर्षांपासून ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार होते. 

  • 14/15

    २००१ पासून अहमद पटेल हे सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार होते. जानेवारी १९८६ मध्ये ते पहिल्यांदा गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९७७ ते १९८२ दरम्यान ते यूथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले.

  • 15/15

    सप्टेंबर १९८३ ते १९८४ दरम्यान अहमद पटेल यांनी काँग्रेसचे सहसचिव म्हणूनही काम केलं. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे कोषाध्यक्ष बनवण्यात आलं. (सर्व फोटो अहमद पटेल यांच्या फेसबुकवरुन, सोशल मीडियावरुन तसेच पीटीआयवरुन साभार)

Web Title: Congress senior leader ahmed patel dies know his networth and family income scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.