• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is neera tanden likely to be joe biden budget chief scsg

अमेरिका : भारतीय वंशाच्या नीरा टंडन होणार Budget Chief; जाणून काय जबाबदारी असणार त्यांच्यावर

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन करणार नियुक्ती

Updated: September 9, 2021 00:45 IST
Follow Us
  • अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची नियुक्ती बजेट चीफ म्हणजेच अर्थसंकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याची शक्यता आहे. टंडन या सध्या डाव्या विचारसरणीची थिंकटँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फऑर अमेरिकन प्रोग्रेसच्या (सीएपी) अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच त्या अमेरिकन प्रोग्रेस अ‍ॅक्शन फंडच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
    1/15

    अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची नियुक्ती बजेट चीफ म्हणजेच अर्थसंकल्पाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्याची शक्यता आहे. टंडन या सध्या डाव्या विचारसरणीची थिंकटँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंटर फऑर अमेरिकन प्रोग्रेसच्या (सीएपी) अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच त्या अमेरिकन प्रोग्रेस अ‍ॅक्शन फंडच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

  • 2/15

    ट्रम्प यांनी बजेट चीफ हे पद रस्सेल वॉट यांना दिलं होतं. डायरेक्टर ऑफ ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड बजेटच्या (ओएमबी) संचालकपदी नियुक्त होण्यापूर्वी रस्सेल यांनी ओएमबीच्या उपसंचालक आणि कार्यवाहक संचालक म्हणून काम पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या पाठिशी दांडगा अनुभव असल्याने ट्रम्प यांनी त्यांना ही जबाबदारी दिली होती.

  • 3/15

    बजेट चीफ म्हणजे काय? : बायडेन हे टंडन यांना बजेट चीफ म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. टंडन या पूर्वी हिलरी क्लिंटन यांच्या सहकारी होत्या. २००८ साली हिलरी क्लिंटन यांनी पहिल्यांदा अमेरिकन राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून तयारी सुरु केली होती त्यावेळी टंडन या त्यांच्या सहकारी होत्या. 

  • 4/15

    ओएमबीच्या अध्यक्ष झाल्यानंतर टंडन यांच्या खांद्यावर बायडेन यांच्या प्रशासनाच्या सर्व खर्चाची जबाबदारी पाहण्याचं काम पडेल. 

  • 5/15

    वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार बायडेन यांना उदारमतवादी आणि केंद्रीय अर्थकारणावर जोर देणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती प्रमुख पदांवर करायची आहे. याच उद्देशाने टंडन यांची बेजट चीफपदी नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

  • 6/15

    टंडन यांनी ट्विटर प्रोफाइलवर आपली ओळख, "सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसच्या अध्यक्षा, लिब्रल, इंडियन-अमेरिकन, फेमिनिस्ट, आई, बायको" अशी करुन दिली आहे.

  • 7/15

    सी-स्पॅनला २०१२ साली दिलेल्या मुलाखतीमध्ये टंडन यांनी आपण जेव्हा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामध्ये शिकत होता तेव्हाच स्टुडंट गव्हर्मेंटमध्ये सहभाग नोंदवण्यास सुरुवात केल्याचे म्हटले होते. आपण विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि जिंकलीही होती असंही टंडन म्हणाल्या होत्या.

  • 8/15

    १९८८ साली टंडन यांनी पहिल्यांदा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उडी घेतली ती मायकल डुकाकीस यांच्यासाठी. मात्र त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदावर म्हणून फार काही करता आलं नाही. मुलाखतीमध्ये टंडन यांनी जेव्ही मी केवळ ११ वर्षांची होते तेव्हा मी रोनाल्ड रेगन यांची समर्थक होते, असंही म्हटलं होतं. 

  • 9/15

    "मी माझ्या पालकांसारखी होती. माझी आई कायमच डेमोक्रॅट होती. त्यामुळे अनेकदा आमच्यामध्ये राजकीय चर्चा रंगायच्या. मी रेगन यांची खूप मोठी चाहती होती. मी दोन ते तीन वर्ष त्यांची मोठी समर्थक होते," असं टंडन सांगतात. 

  • 10/15

    नंतर मी हायस्कूलमध्ये जायला लागले. त्यानंतर मला महिलांसंदर्भातील विषयांमध्ये अधिक रस वाटू लागला. त्यानंतर मी जेव्हा कॉलेजला जाऊ लागले तेव्हा मी पूर्णपणे आईप्रमाणे डेमोक्रॅट विचारसरणीची झाली होते. पहिल्या सेमिस्टरपर्यंत मी मायकल डुकाकीस यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करु लागलेले," अशा शब्दांमध्ये टंडन यांनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला होता. 

  • 11/15

    टंडन यांच्या पालकांचा त्या पाच वर्षांच्या असतानाच घटस्फोट झाला होता. टंडन यांच्या आईने सिंगल मदर म्हणून त्यांचे पालनपोषण केलं. 

  • 12/15

    सरकारी धोरणांचा फायदा झालेल्या व्यक्तींपैकी मी एक आहे. यामध्ये अगदी खाद्य पदार्थांपासून घरांसाठी सूट देण्यापर्यंत अनेक योजनांचा फायदा आम्ही घेतला आहे असं टंडन स्पष्टपणे सांगतात. 

  • 13/15

    बजेट चीफ झाल्यानंतर टंडन यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या येणार? : ओएमबीच्या प्रमुख म्हणून अर्थसंकल्प तयार करणे आणि तो अंमलात आणण्याची सर्व जबाबदारी टंडन यांच्यावर असेल. 

  • 14/15

    नियामक धोरणे, अर्थसंक्लपाच्या कायदेविषयक मंजुरीसंदर्भातील काम, समन्वय आणि कार्यकारी आदेश आणि अध्यक्षीय व्यवहारांची जबाबदारीही टंडन यांच्यावर असेल.

  • 15/15

    ओएमबीवरील पदांसाठी अध्यक्ष शिफारस करतात त्यानंतर सिनेटकडून यावर शिक्कामोर्तब केलं जातं. यामध्ये संचालक, उपसंचालक, कार्यवाहक संचालक यासारख्या अनेक पदांचा समावेश असतो. (सर्व फोटो : सोशल नेटवर्किंग (फेसबुक, ट्विटर, पीनट्रेस), विकिपिडिया, एपी आणि रॉयटर्सवरुन साभार)

Web Title: Who is neera tanden likely to be joe biden budget chief scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.