• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mdh leaves pakistan after partition drives tanga in delhi then becomes masala king untold story of mahashay dharampal gulati jud 87

टांगा चालवण्यापासून ते एमडीएच कंपनीचे मालक; असा आहे धर्मपाल गुलाटी यांचा प्रवास

Updated: September 9, 2021 00:45 IST
Follow Us
  • धर्मपाल गुलाटी यांचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा असेल. आम्ही तुम्हाला सांगतोय ते एमडीएच या कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांच्याबाबत. आयआयएफएल हुरून इंडिया रिच २०२० च्या यादीत सामील असलेले ते सर्वात वयस्कर भारतीय श्रीमंत व्यक्ती होते. आज पहाटे त्यांचं हृदय बंद पडल्यानं निधन झालं.
    1/10

    धर्मपाल गुलाटी यांचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा असेल. आम्ही तुम्हाला सांगतोय ते एमडीएच या कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांच्याबाबत. आयआयएफएल हुरून इंडिया रिच २०२० च्या यादीत सामील असलेले ते सर्वात वयस्कर भारतीय श्रीमंत व्यक्ती होते. आज पहाटे त्यांचं हृदय बंद पडल्यानं निधन झालं.

  • 2/10

    एकेकाळी त्यांच्याकडे १ हजार ५०० रूपये होते. परंतु आज ते तब्बल ५ हजार ४०० कोटी रूपयांचे मालक आहेत. त्यांना वार्षिक २५ कोटी रूपयांचं वेतन मिळत होतं. गुलाटी यांचं वेतन अन्य कोणत्या एफएमजीसी कंपनीच्या सीईओंच्या तुलनेत अधिक होतं.

  • 3/10

    गुलाटी यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. महाशियन दी हट्टी (एमडीएच) कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी हे विभाजनानंतर आपल्या कुटुंबीयांसह भारतात आले.

  • 4/10

    दिल्लीत आल्यानंतर त्यांना टांगा चालवणं सुरू केले. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी १५०० रूपयापैकी ६५० रूपयांमध्ये एक टांगा आणि घोडा खरेदी केला. तसंच स्टेशन परिसरात ते टांगा चालवू लागले. परंतु काही दिवसांनी त्यांनी आपल्या भावाला टांगा देऊन करोलबाग परिसरातील अजमल खां रोडवर मसाले विकण्यास सुरूवात केली.

  • 5/10

    जसजसं त्यांच्या मसाल्याबद्दल समजत गेलं तसा त्यांचा व्यवसाय वाढत गेला. गुलाटी यांनी आपली सर्वात पहिली कंपनी १९५९ मध्ये दिल्लीतील किर्तीनगर परिसरात सुरू केली. त्यानंतर अजमल खां रोडवर त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली. ६० च्या दशकात एमडीएचचं करोल बाग परिसरातील दुकानानं प्रसिद्धी मिळवली होती.

  • 6/10

    कालांतरानं त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे मसाले पोहोचले आहेत. ५ हजार ४०० कोटी रूपयांच्या संपत्तीसह आयआयएफएलच्या यादीत ते २१६ व्या स्थानावर होते. तसंच यूरॉमॉनिटरनुसार ते एफएमजीसी क्षेत्रात सर्वाधित वेतन घेणारे सीईओ होते. गुलाटी यांचं वेतन २५ कोटी रूपये होतं.

  • 7/10

    वयोमानानुसार ते आजही सर्वात जास्त सक्रिय होते. गुलाटी हे स्वत: आपली कंपनी, डिलर आणि बाजारात जात असत.

  • 8/10

    एमडीएचहा मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रॅन्डपैकी एक आहे. तसंच त्यांच्या कंपनीत ५० निरनिराळ्या मसाल्यांचं उत्पादन केलं जातं. एमडीएचचं आज केवळ भारतातच नाही तर दुबई आणि लंडनमध्येही कार्यालयं आहेत.

  • 9/10

    एमडीएच आज सामाजिक कार्यांमध्ये पुढे आहे. कंपनीद्वारे महाशय चुन्नीलास ट्रस्टचं संचालन केलं जात असून २५० बेड्सचं एक रुग्णालयदेखील चालवलं जातं.

  • 10/10

    याव्यतिरिक्त त्यांचं एक मोबाईल रुग्णालयदेखील आहे. झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाना याद्वारे आरोग्यसेवा दिली जाते. याव्यतिरिक्त त्यांच्या ट्रस्टच्या चार शाळाही आहेत. तसंच गरजू लोकांनाही मदत केली जाते.

Web Title: Mdh leaves pakistan after partition drives tanga in delhi then becomes masala king untold story of mahashay dharampal gulati jud 87

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.