-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच करोना लसीसंदर्भातील महत्वाची माहिती. यामध्ये मोदींनी काही दिवसांपूर्वीच देशामध्ये लसनिर्मीत करणाऱ्या कंपन्यांना भेट दिल्याचा संदर्भ देत करोनाची लस कधी उपलब्ध होणार, ती सर्वात आधी कोणाला दिली जाणार यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली.
-
मोदींनी यावेळी करोनाच्या लसीकरणादरम्यान देशवासियांकडून त्यांना काय अपेक्षा आहेत यासंदर्भातही महत्वाचं आवाहन केलं आहे. एकीकडे करोनाची लस निर्मिती सुरु असली तरी करोनासंदर्भात बेसावध राहणं परवडणारं नाही असं मतही मोदींनी व्यक्त केलं आहे. देशामध्ये करोनाच्या आठ लसींवर काम सुरु असून त्यापैकी तीन भारतीय असल्याचेही मोदी म्हणालेत.
-
काही आठवड्यांमध्ये करोनाची लस उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यास लसीकरणाला देशात सुरुवात केली जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं.
-
वैज्ञानिकांशी चर्चा झाली असून देशामध्ये सध्याच्या घडीला आठ लसींची चाचणी सुरु असल्याची माहिती मोदींनी दिली.
-
सध्या जगभरात विविध कंपन्या करोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने जास्त आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेदेखील आहे, असंही मोदी म्हणाले.
-
लसीची किंमत किती असेल? असा प्रश्न स्वाभाविक असून. केंद्र सरकार यासंदर्भात राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही सर्वसामान्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
-
एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण होतं तेव्हा अनेक अफवा उठतात. या अफवा जनहीत आणि देशहीताच्या विरोधात असतात. सर्वांना मी आवाहन करतो की लोकांना या लसींसंदर्भात जागृक करा आणि ते कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
-
करोना लसीकरणाच्या वेळी आजारी आणि वृद्धांना प्राधान्य दिलं जाईल. त्याचप्रमाणे फ्रण्ट लाइनवर काम करणाऱ्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतर अत्यवश्यक सेवेतील व्यक्तींना लस देताना प्राधान्य दिलं जाईल असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.
-
सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणासंदर्भात सहकार्य करावं असंही मोदींनी यावेेळी म्हटलं आहे.
-
राज्यांबरोबर झालेल्या चर्चेमधून अनेक महत्वाचे सल्ले मिळाल्याचेही मोदींनी सांगितलं आहे. सध्या देशामध्ये आठ लसींची चाचणी सुरु असून त्यापैकी तीन लसी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत, अशी माहिती मोदींनी दिली आहे.
-
करोनासंदर्भातील लसीसाठी फारशी वाट पहावी लागणार नाही असे स्पष्ट संकेत मोदींनी दिले आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल असे स्पष्ट संकेत मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिले आहेत.
-
एकीकडे लस येत असली तरी दोन फुटांचं अंतर, मास्क या मूळ गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत असं सांगत मोदींनी करोनाबद्दल बेजबाबदारपणे वागून चालणार नाही असा इशाराही दिला आहे.
-
आज जगभरामध्ये आपण करोनाचा आलेख कशापद्धतीने प्रवास करतोय हे पाहतोय. त्यामुळे भविष्यात हा आलेख कसा जाईल हे आत्ताच सांगता येणार. म्हणून आपल्या सर्वांना सावधान राहणं गरजेचे आहे, असंही मोदी म्हणाले.
-
आजपर्यंत आपण करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये जे काही कमवलं आहे ती कामगिरी चांगली आहे असंही मोदी लसीसंदर्भातील माहिती देताना म्हणालेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सामान्यांना लसीकरणासंदर्भात तुमचे काही सल्ले असल्यास आम्हाला लेखी पाठवा त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असं आश्वासनही दिलं आहे.
भारतातील करोना लस: कधीपर्यंत?, कोणाला?, कशी आणि किती किंमतीत… मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
मोदींनी आज सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर देशातील नागरिकांशी साधला संवाद
Web Title: India covid vaccine when how and who and price pm modi answers all questions about vaccine scsg